rohit sharma virat kohli twitter
क्रीडा

IND vs BAN बांगलादेश मालिकेसाठी विराट- रोहित चेन्नईत दाखल; PHOTO व्हायरल

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत. आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीदेखील चेन्नईत पोहोचला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली चेन्नई विमानतळावर असल्याचं दिसून आलं आहे. रोहित शर्मा गुरुवारी रात्री चेन्नईत पोहोचला असल्याचं म्हटलं जात आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका झाल्यानंतर लंडनला परतला होता. गेले काही दिवस तो लंडनमध्येच होता. मात्र बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी तो लंडनहून थेट चेन्नईला आल्याचं म्हटलं जात आहे.

भारतीय संघाचा सराव

भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून भारतीय संघासोबत दोन हात करणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघ मार्च महिन्यात आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंना कसून सराव करावा लागणार आहे. बांगलादेशला हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण, काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने पाकिस्तानला घरात घुसून हरवलं होतं.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

बांगलादेशचा संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.

या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT