virat kohli yandex
Sports

Ranji Trophy: विराट- रोहित रणजी ट्रॉफी खेळणार? या दिवशी उतरणार मैदानात

Virat Kohli- Rohit Sharma In Ranji Trophy: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही फ्लॉप ठरले होते. आता हे दोघेही रणजी ट्रॉफी खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Ankush Dhavre

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांनी भारताच्या फलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघेही आऊट ऑफ फॉर्म आहेत.

दोघांनाही फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत दोघेही धावा करण्यात अपयशी ठरले. भारतीय संघाने या मालिका तर गमावल्या, यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची संधीही गमावली आहे. दरम्यान आता बीसीसीआयने नवीन नियम लागू केले आहेत.

बीसीसीआयने लागू केलेल्या नव्या नियमानुसार, जर खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसतील, तर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागणार आहे. विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. तो १२ वर्षांपूर्वी आपला शेवटता रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पुढील फेरीतील सामन्यांना २३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. DDCA चे सचिव अशोक शर्मा म्हणाले की, शुक्रवारी संघाची घोषणा केली जाईल. विराट खेळणार की नाही, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

माध्यमातील वृत्तानुसार कोहली दिल्लीच्या संघासोबत जोडला जाऊ शकतो आणि दिल्लीच्या संघासोबत सराव करताना दिसून येऊ शकतो. दिल्लीचा पुढील सामना २३ जानेवारीपासून सौराष्ट्रविरुद्ध रंगणार आहे.

रोहित मुंबईकडून खेळणार?

भारताचा कर्णधार रोहित शर्मादेखील आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे रोहितला देखील आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. रोहित मुंबईच्या रणजी संघासोबत सराव करताना दिसून आला आहे. यावरुन असे संकेत मिळत आहेत की, तो मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळताना दिसून येऊ शकतो. मात्र त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही. मुंबईचा पुढील सामना येत्या २३ जानेवारीपासून जम्मू काश्मिरसोबत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

SCROLL FOR NEXT