12 मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास क्रिकेट चाहत्यांना एक मोठा धक्का बसला. इन्स्टाग्राम उघडताच चाहत्यांच्या समोर विराटने स्वतः केलेली निवृत्तीची पोस्ट समोर आली. 269 signing off असं म्हटत विराटने टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे. रोहित शर्मानंतर आता विराट कोहली देखील टेस्ट क्रिकेट खेळणार नाही. रोहितप्रमाणेच विराटनेही सोशल मीडियाद्वारे त्याचा हा निर्णय चाहत्यांपर्यंत पोहोचवला. मात्र विराट कोहलीच्या निवृत्तीमागे नेमकं कारण काय आहे असा प्रश्न चाहत्यांना मनात घर करून आहे.
36 वर्षीय विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटला टाटा म्हणत सर्वांना चकीत केले आहे. याचं कारण म्हणजे विराट कोहली फिट होता, फॉर्ममध्ये होता आणि इंग्लंड दौऱ्यासाठीही खूप महत्वाचा होता. पण या सगळ्या गोष्टींनंतर देखील त्याने टेस्ट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याने चाहते मात्र संभ्रामात आहेत.
काही क्रिकेट तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हे पूर्णपणे आश्चर्यकारक करणारं आहे. हे स्पष्ट आहे की गेल्या आठवड्याभरात बरेच काही घडलंय. कारण आधी रोहित शर्माची निवृत्ती, आता विराट कोहलीची निवृत्ती, ही पूर्णपणे २०११-१२ ची आठवण करून देणारी आहे. ज्यावेळी २ बड्या खेळाडूंनी सलग दोन टेस्ट सिरीज गमावल्यानंतर निवृत्ती घेतली होती.
विराटच्या निवृत्तीमागे कम्युनिकेशन गॅप असल्याचं पाहायला मिळतंय. आपण एकंदरीत पाहिलं तर कोहलीची मानसिकता, तयारी या सर्व गोष्टी तो इंग्लंडसाठी तयार असल्याचं स्पष्ट करत होतं. पण अचानक असं काय झालं की, विराट कोहलीने निवृत्ती घेतली. इतकंच नाही तर टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन्सच्या स्वप्नही अपूर्ण राहिलंय.
विराट कोहली हा मोठा खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी आव्हान वाटतो, त्याने ऑस्ट्रेलियात चांगली सुरुवात केली पण नंतर शंका येऊ लागल्या. गेल्या पाच वर्षांत विराट कोहलीची टेस्टमधील सरासरी घसरत चालली होती. विराट इंग्लंडसाठी रेड बॉलने सराव करत होता. मात्र अचानक त्याने निवृत्ती घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.