virat kohli saam tv news
Sports

Virat Kohli Record: किंग कोहलीला तोडच नाय! या बाबतीत विराटच ठरलाय नंबर १

Virat Kohli Latest News: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसीने) गुरुवारी (२५ जानेवारी) आयसीसीच्या पुरस्कार विजेत्या खेळाडूंची घोषणा केली आहे. यासह विराटच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Most ICC Award As A Player:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसीने) गुरुवारी (२५ जानेवारी) आयसीसीच्या पुरस्कार विजेत्या खेळाडूंची घोषणा केली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ठरला आहे. यासह विराटचा हा आयसीसीकडून मिळणार दहावा वैयक्तिक पुरस्कार ठरला आहे.

विराट ठरला नंबर १ ..

आयसीसीचे सर्वाधिक पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानी पोहोचला आहे. विराटने १० वेळेस हा कारनामा करून दाखवला आहे. दरम्यान या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी प्रत्येकी ४-४ वेळेस हा कारनामा करून दाखवला आहे. मात्र कोणीच विराट कोहलीच्या आसपासही पोहचू शकलेलं नाही.

चौथ्यांदा पटकावला पुरस्कार..

विराट कोहली आपल्या वनडे कारकिर्दीत चौथ्यांदा वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ठरला आहे. २०१२ मध्ये त्याने पहिल्यांदा या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. ज्यावेळी त्याने हा पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी त्याचं वय केवळ २४ वर्ष होतं. आता वयाच्या ३५ व्या वर्षी तो चौथ्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. (Latest sports updates in marathi)

हे आहेत विराटने जिंकलेले १० पुरस्कार...

क्रिकेटर ऑफ द डीकेड- २०१०

वनडे क्रिकेटर ऑफ द डीकेड- २०१०

वनडे क्रिकेटर ऑफ द इयर- २०१२

वनडे क्रिकेटर ऑफ द इयर -२०१७

क्रिकेटर ऑफ द इयर- २०१७

क्रिकेटर ऑफ द इयर- २०१८

टेस्ट क्रिकेट ऑफ द इयर - २०१८

वनडे क्रिकेटर ऑफ द इयर- २०१८

स्प्रिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड- २०१९

वनडे क्रिकेटर ऑफ द इयर- २०२३

तिन्ही फॉरमॅटमध्ये किंग कोहलीचा जलवा..

विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार खेळ करून दाखवला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११३ कसोटी सामन्यांमध्ये ८८४८ धावा केल्या आहेत. तर २९२ वनडे सामन्यांमध्ये १३८४८ आणि टी -२० क्रिकेटमधील ११७ सामन्यांमध्ये ४०३७ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT