ICC cricket of the year: विराट वनडे तर कमिन्स ठरला क्रिकेटर ऑफ द इयर! पाहा ICC च्या पुरस्कारांची संपूर्ण यादी

ICC cricket of the year News Update: विराट विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तर दुसरीकडे पॅट कमिन्सची आयसीसीचा क्रिकेट ऑफ द इयर ठरला आहे. ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरला आहे.
Virat kohli and
Virat kohli and Saam tv
Published On

ICC cricket of the year News:

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने गेल्या वर्षी जबरदस्त कामगिरी करत आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयरचा मानकरी ठरला आहे. विराट कोहलीसाठी २०२३ वर्ष सर्वोत्कृष्ट ठरलं. विराट विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तर दुसरीकडे पॅट कमिन्सची आयसीसीचा क्रिकेट ऑफ द इयर ठरला आहे. ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरला आहे. (Latest Marathi News)

विराट कोहली रचला इतिहास

किंग कोहलीने आयसीसी मेन्स वनडे क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार जिंकत एकूण १० आयसीसीचे पुरस्कार जिंकण्याची किमया केली आहे. त्याच्या शिवाय एकही खेळाडूने पाच आयसीसी पुरस्कार जिंकले नाहीत. तर आज विराटने चौथ्यांदा वनडे क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार पटकावण्याचा मान पटकावला.

Virat kohli and
Virat Kohli: कोहली तुस्सी ग्रेट हो...! विराट चौथ्यांदा ठरला आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इअर

विराटने २०१२ साली २४ वर्षांचा असताना विराटने आयसीसी मेन्स वनडे क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार पटकावण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर आता वयाच्या ३५ व्या वर्षी वनडे क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार पटकावला आहे.

सर्वाधिक आयसीसी पुरस्कार जिंकणारे खेळाडू

१० - विराट कोहली

४ - कुमार संगकारा

४ - एमएम धोनी

४- स्टीव स्मिथ

३ मिशेल जॉनसन

३ - रिकी पॉटिंग

३- एबी डी व्हिलियर्स

Virat kohli and
T20 Cricketer Of The Year: एकच वादा, सूर्या दादा! सलग दुसऱ्यांदा 'टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर'पुरस्काराचा मानकरी

विराट कोहली ,कमिन्स व्यतिरिक्त इतरही खेळाडूंनी आयीसीसचे पुरस्कार पटकावले आहेत.

त्यांची यादी खालीलप्रमाणे

आयसीसी 2023 पुरस्कार

सर्वोत्तम कसोटीपटू - उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)

सर्वोत्तम पंच - रिचर्ड इलिंगवर्थ

सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू - रचिन रविंद्र (न्यूझीलंड)

सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू - फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)

सहसदस्य संघातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू - बास दे लीड (नेदरलँड्स)

सहसदस्य संघातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू - क्विंटर एबेल (केनिया)

सर गॅरी सोबर्स ट्रॉफी (सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 2023) - पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)

रेचल हेहो फ्लिंट ट्रॉफी (सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 2023) - नतालिया सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)

सर्वोत्तम वनडे पुरुष क्रिकेटपटू - विराट कोहली (भारत)

सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेटपटू - चामरी अटापट्टू (श्रीलंका)

सर्वोत्तम टी२० पुरुष क्रिकेटपटू - सूर्यकुमार यादव (भारत)

सर्वोत्तम टी२० महिला क्रिकेटपटू - हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com