Virat kohli record news in marathi virat heading towards biggest milestone in ipl tournament in rcb vs lsg match amd2000 yandex
Sports

Virat Kohli Record: विराट रेकॉर्ड करण्यापासून किंग कोहली एक पाऊल दूर! असा कारनामा करणारा ठरणार जगातील पहिलाच फलंदाज

RCB vs LSG, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विराटला एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Record In T20 Cricket:

आयपीएल २०२४ स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपतेय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकं झळकावत त्याने १८१ धावांपर्यंत मजल मारली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विराटला एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

विराटची या महारेकॉर्डवर नजर...

लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. विराटने जर या सामन्यात १३२ धावांची खेळी करताच त्याला टी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी खेळताना ८ हजार धावा करण्याची संधी असणार आहे. टी-२० क्रिकेटमधील एकाच सामन्यात १३२ धावांची खेळी करणं थोडं कठीण आहे.

मात्र त्याचा फॉर्म पाहता, तो हा रेकॉर्ड याच सामन्यात करु शकतो. विराटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २५५ सामन्यांमध्ये ७८६८ धावा केल्या आहेत. यात आयपीएल आणि चॅम्पियन लीग स्पर्धेतील धावा एकत्रित करण्यात आल्या आहेत. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना ८००० धावा पूर्ण करण्यासाठी १३२ धावांची गरज आहे. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ७४४४ धावा केल्या आहेत. तसेच चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळताना त्याने १५ सामन्यांमध्ये ४२४ धावा केल्या आहेत. (Cricket news in marathi)

आयपीएलमध्ये या बाबतीत नंबर १...

विराट कोहलीची बॅट आयपीएल स्पर्धेत चांगलीच तळपते. आयपीएल स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ७ शतकं झळकावली आहेत. यासह टी-२० क्रिकेटमधील एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड देखील विराट कोहलीच्या नावावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं होम ग्राऊंड, एम चिन्नास्वामीच्या मैदानावर खेळताना विराट कोहलीने ३२७६ धावा केल्या आहेत. तर लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध खेळताना त्याने ४ सामन्यांमध्ये ११७ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालवण येथे बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह 18 तासानंतर सापडला

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT