Actress Abused: टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना; मदतीचं कारण सांगून जंगलात फरफटत नेलं अन्...

Actress Abused: टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री रतन राजपूत हिच्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे. या घटनेने चाहत्यांना धक्का बसला असून ही बातमी सर्वत्र चर्चेत आहे.
Actress Abused
Actress AbusedSaam Tv
Published On

टीव्हीवरील संस्कारी सुनेच्या भूमिकेने घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रतन राजपूत हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या आयुष्यात घडलेली एक भीषण घटना सांगितली आहे. ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या रतनने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिच्या आयुष्यातील भीषण अनुभव उघड केला आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे.

रतन राजपूतने तिच्या व्ह्लॉगमध्ये एका विचित्र आणि धक्कादायक रात्रीचा किस्सा शेअर केला. ती फोनवर बोलत असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने तिचा फोन हिसकावला आणि नंतर तो पळून गेला. रतनने मदतीसाठी जोरात आरडाओरडा केला, पण त्या आसपासचे लोक फक्त तमाशा पाहत होते आणि कोणालाही मदत करण्याची इच्छा नव्हती.

Actress Abused
Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

त्या अज्ञात व्यक्तीचा फोन हिसकावल्यानंतर, रतन जेव्हा मदतीला कोणीतरी येईल अशी अपेक्षा करत होती, तेव्हा एक तरुण समोर आला आणि म्हणाला की तो तिला मदत करून तिचा फोन परत देईल. ते म्हणताच त्याने रतनचा हात धरला आणि जोरात खेचत जंगलाकडे नेलं. रतन या अचानक घडलेल्या परिस्थितीवर घाबरली. तिला वाटलं की आता ती वाचणार नाही किंवा तिच्यावर काही वाईट होणार आहे.

Actress Abused
Actor Accident: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात; भरधाव दुचाकीने उडवले, पत्नीच्या डोक्याला जबर मार

रतनने सांगितले की त्या मुलाच्या हावभाव विचित्र होते. ज्यामुळे तिला अजूनच भीती वाटू लागली. तिला जाणवलं की ही परिस्थिती काही साधी नाही आणि ती भलतच काही वाईट गोष्टीमध्ये फसली आहे. पण नशीबाने दोन मुली स्कुटीवरून त्या दिशेने आल्या आणि तिला मदत केली. त्यांनी त्या अज्ञात मुलाला तिचा हात सोडण्यास सांगितले आणि शेवटी रतनची सुटका झाली आणि त्या तिथून निघून गेल्या

रतनने या घटनेतून असा संदेश दिला की, जरी आपण मदतीसाठी आरडाओरडा करत असलो तरी, लोक फक्त पाहतात पण पुढे येऊन मदत करत नाहीत आणि अशा परिस्थितीत आपल्याला सुरक्षिततेबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. या घटनेमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि तिला स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा सल्ला देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com