
माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, मार्क्सवादी पक्षाचे जेष्ठ माजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीत सुरु झाला प्रचार
भरधाव टॅक्सी मार्गालगत खड्ड्यात पलटी झाल्याने टॅक्सीतील दहा जण गंभीर जखमी.
नसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे ,कल्याण डोंबिवली सह राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवर आरोप करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर, आता भाजपकडून थेट आणि तीव्र प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी अविनाश जाधव यांच्यावर “नोटा म्हणजे काय, याचाही अभ्यास नसताना आरोप केले जात आहेत” अशी टीका केली आहे तसेच नोटा (NOTA) हा कोणताही उमेदवार नसून ‘None of the Above’ म्हणजेच कोणताही उमेदवार पसंत नसल्याचा पर्याय आहे.
बुलढाणा छत्रपती संभाजी नगर महामार्गावर धाड गावाजवळ जवळ एसटी बस व दुचाकी समोरासमोर धडक.
भीषण अपघातात दुचाकी वरील तीन युवकांचा जागीच मृत्यू.
भरधाव दुचाकी छत्रपती संभाजी नगरहून बुलढाणाकडे जाणाऱ्या शिवशाही बसला धडकून झाला अपघात.
देवा भाऊच्या माध्यमातून विकसित मराठावाडा विकसित नांदेड करून घ्यायचं आहे
मी फक्त बोलणारा नाही, मी जे बोलतो ते करून दाखवतो
फक्त शिव्या देणे हा विरोधकांचा अजेंडा आहे- अशोक चव्हाण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल २४ ड्रोन शहरातील संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येत असून एसआरपीएफचे ९ प्लॅटून देखील तैनात करण्यात आले आहेत
शिरपूर तालुक्यातील बलकुवे गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी ठाकरे सेना कार्यकर्ते व ग्रामस्थ आक्रमक होत कुटुंबियांसह ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले आहे,
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चौकशी व्हावी यासाठी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या अख्ख्यारित हा विषय न ठेवता थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखी मध्ये याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका मनसेकडून एडवोकेट असीम सरोदे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालांपूर्वी याचिकेवर सुनावणी व्हावी अशी अपेक्षा सरोदे यांनी व्यक्त केलीय.
बावधनमधील विवा हॉल मार्क सोसायटीत सदनिकेला भीषण आग
अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे दुर्घटना टळली
बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजसमोर असलेल्या विवा हॉल मार्क सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागल्याची घटना दुपारी घडली
रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज रायगड दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यादरम्यान नागोठणे येथे झालेल्या जाहिर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अजितदादा पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीडच्या चौसाळा परिसरात धुळे-सोलापूर महामार्गावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी झाले असुन गेल्या काही काळापासून वाहतूक खोळंबली होती. NHAI च्या टिमने रस्त्यावर कोसळलेले ट्रॅक्टर, ट्रॉली बाजूला काढली आहे तर वाहतूक एका लेन मधून सुरू करण्यात आली आहे.
कळमनुरी व वसमत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे दरम्यान हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेत शेतकऱ्यांनी एक अजब मागणी केली आहे, जिल्हाधिकारी साहेब आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायला तयार आहोत तुम्ही आमचा भाजपमध्ये प्रवेश करून द्या असे म्हणत सुपीक जमिनीमधून सरकार घेऊन जात असलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा असं शेतकरी म्हणाले आहेत
नारायण राणे यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत राज्याच्या कोकणाच्या हिताचे आहेत असे मला वाटत नाही - खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री, मंत्री पदावर काम करताना राज्याच्या, कोकणच्या विकासात नारायण राणे यांचं मोठं योगदान
संसदेतही त्यांची कामगिरी महत्वाची राहिली आहे
नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत का दिले हे मला कळत नाही
नाशिक जिल्हा प्रशासनाला अॅडव्होकेट श्री. श्रीराम पिंगळे यांचा हरित लवादाच्या माध्यमातून आणखी एक धक्का
संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीस आज अंतरिम स्थगिती
'अविरोध निवडणूक लोकशाहीला घातक - आमदार अमोल मिटकरी
सध्या राज्यभरात अविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवरून मोठा राजकीय वाद-प्रतिवाद सुरूये.
यात आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही उडी घेतलीय. त्यांनी आज एक ट्वीट करत अविरोध निवडणूक ही लोकशाहीला घातक असल्याचे म्हटलंय.
अविरोध निवडणूक ही लोकशाहीच्या मूळ तत्वांशी विपरीत असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेत. हा पायंडा चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
बीड -
बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन अंतर्गत येत असलेल्या दत्तनगर शाळेतील मुलांनी अडवला जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता
दत्तनगर जिल्हा परिषद शाळेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर रस्त्यासाठी आंदोलन
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चौकशी करा
यासाठी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे
राज्य निवडणूक आयोगाच्या अख्ख्यारित हा विषय न ठेवता थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखी मध्ये याची संपूर्ण चौकशी व्हावी
ही मागणी करणारी याचिका मनसेकडून असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल
नाशिक -
- प्रचाराला अवघे ८ दिवस शिल्लक राहिल्याने पायी प्रचार रॅलीवर उमेदवारांचा भर
- पिढ्यानपिढ्या काँग्रेसी घराणं असलेल्या आणि पंजावर निवडणूक लढवणाऱ्या दिवेंच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण
- प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना थेट लढत
धाराशिव शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद विजयी संकल्प मेळावा
माजी मंत्री आ.तानाजी सावंत यांच्याकडून कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची दुसरी वेळ जोरदार शक्ती प्रदर्शन
अहिल्यानगर -
अहिल्यानगरमध्ये आज भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ होता
सभेसाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सकाळीच दहा वाजता हेलिकॉप्टरने नगर शहरात पोहचले
त्यांच्या उपस्थित रॅली काढण्यात आली होती मात्र रॅलीलाल उशीर झाल्याने आणि राज्यात इतर ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ असल्याने रवींद्र चव्हाण यांनी सभेच्या ठिकाणी मोजून दोन मिनिटे भाषण करून सभा स्थळावरून निघाले
रब्बी हंगाम सुरू असताना गहू, हरभरा आणि कांदा यांसारख्या पिकांना युरियाची नितांत गरज असते.
मात्र, गरजेच्या वेळी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना उपसाधनांसाठी इतर ठिकाणी धावाधाव करावी लागत आहे.
खत दुकाने आणि सेवा सहकारी संस्थांबाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
शासन आणि प्रशासनाकडून तातडीने पुरवठा वाढवावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाचा निवडणुकीतील सावळा गोंधळ थांबायचं नाव घेत नाहीये पहिले मतदार यादी नंतर मतदान केंद्र बदलण्याचा घोळ आणि आता उमेदवारांना लागणाऱ्या परवानगी देण्यासाठी असलेल्या एका खिडकीचा घोळ शहरांमध्ये जवळपास 65 जागांसाठी 411 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 411 उमेदवारांना प्रचारासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानगी देण्यासाठी केवळ एकच खिडकी मनपा प्रशासनाने दिली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आत्ता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. अश्यातच पुण्यातील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवसेनेचे उमेदवार साकिब आबाजी यांच्याकडून निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे.मतपत्रिकेवर नाव वेगळं छापून आल्याने आक्रमक झालेल्या या उमेदवाराकडून आंदोलन सुरू करण्यात आलं असून जो पर्यंत माझं नाव दुरुस्त होत नाही तो पर्यंत मी येथून उठणार नसल्याचं त्याने सांगितल आहे.
चाकण–शिक्रापूर महामार्गावर शिक्रापूर जवळ पहाटेच्या सुमारास गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी गाडी रस्त्यालगत असलेल्या चहाच्या दुकानात घुसल्याने भीषण अपघात झाला.
भाजप आमदार प्रवीण दरेकर कुडाळमध्ये दाखल: मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे कुडाळ न्यायालयात दाखल
संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने केला होता अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
आता काही वेळात कुडाळ न्यायालयात होणार सुनावणी
२६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात झाला होता गुन्हा दाखल
आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी झाला होता गुन्हा दाखल
कुडाळ न्यायालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. रॅलीत एमआयएम समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आली. एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पाठबळावर आम्ही नगराध्यक्ष निवडून आणला त्याच धर्तीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनिशी सर्व जिल्ह्यात लढवणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटना आहे जरी आमचा राजकीय पक्ष नसला तरी आम्ही आमचा पाठिंबा देऊन आमची लोक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न सातारा जिल्हा कुस्ती संघ यांच्या मान्यतेने औंध येथे महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी पार पडली. अंकुश गोरे युवा मंचच्या वतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. मॅट आणि मैदानी अशा दोन्ही प्रकारांमधील कुस्तीतील निवड चाचणी याठिकाणी पार पडली. या निवडचाचणी करता जिल्हाभरातून 210 मल्लांनी सहभाग घेतला होता त्यामधून 40 मल्लांची निवड महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी झाली आहे. माण-खटावमध्ये ही निवड चाचणी पहिल्यांदाच होत असून गोरे घराण्याला कुस्तीचा वारसा हा पहिल्यापासून असल्याने. आत्ताच्या आभासी दुनियेतून बाहेर येत जिल्ह्यातील युवक खेळामध्ये घडावा,हा हेतु या आयोजन करण्यामागे असल्याचे अंकुश गोरे यांनी सांगितले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी प्रभारी शहर अध्यक्ष म्हणून श्रीकांत पाटील यांची निवड
'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष व आमदार माननीय श्री. शशिकांत शिंदे ह्यांच्या मान्यतेने ‘पुणे शहर प्रभारी अध्यक्ष' पदी श्रीकांत विश्वनाथ पाटील आणि ‘पुणे शहर निवडणूक समन्वयक’ पदी विशाल विलासराव तांबे ह्यांची नियुक्ती करण्यात येत आहे
'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष व आमदार माननीय श्री. शशिकांत शिंदे ह्यांच्या मान्यतेने ‘पुणे शहर प्रभारी अध्यक्ष' पदी श्री. श्रीकांत विश्वनाथ पाटील आणि ‘पुणे शहर निवडणूक समन्वयक’ पदी श्री. विशाल विलासराव तांबे ह्यांची नियुक्ती करण्यात…
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) January 5, 2026
जालन्यात एकीकडे मुख्यमंत्र्यांची सभा असून दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.जालन्यात महानगरपालिका निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना भाजपने डावल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड यांनी केलाय.जालन्यात दानवे, गोरंट्याल आणि लोणीकर यांनी त्यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कोणाकडे उमेदवारी मागायची असा सवाल भाजप कार्यकर्त्यांचा उपस्थित केलाय. दरम्यान निष्ठावंतांना डावल्यामुळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये नाराजी आहे त्यामुळे महानगरपालिकेचा अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता असल्याचं सुनील आर्दड यांनी म्हटलय
उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्यात दाखल
रायगड जिल्ह्यातील तळा शहरात तळा नगरपंचायतीच्या इमारतीच्या भूमिपूजन संपन्न
आठ कोटी रुपयांची नवीन इमारत उभी राहणार
खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरेंसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थि
नाशिकच्या सिन्नर ,निफाड पाठोपाठ येवला तालुक्यातील बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे,येवला तालुक्यातील मुखेड शिवारात दिवसा बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,एका शेतकऱ्याने बिबट्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये कैद केला आहे. दरम्यान या परिसरात वन विभागातर्फे पिंजरा देखील लावण्यात आला आहे मात्र पिंजऱ्यात बिबट्याला आकर्षित करण्यासाठी कुठलीही भक्ष ठेवले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, रिकाम्या पिंजऱ्यात बिबट्या येईल कसा हा सवाल निर्माण झाला आहे....
चाकण बाजार समिती परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला करत लहान मुले महिला आणि जेष्ठ नागरिकांसह एकूण 27 जणांचा चावा घेत जखमी करण्यात आले... जखमींना चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असुन एका बाजुला बिबट्यांच्या हल्ल्याची भिती आहे तर दुस-या बाजुला भटक्या कुत्र्यांचा हंदोस पहायला मिळत असल्याने नागरिक भिती च्या छायेखाली असुन भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन जणांवर शिस्त भंगाची कारवाई
भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांच्यावर होणार पक्षाकडून कारवाई
पुण्यातील प्रभाग क्रमांक १६ मधून देण्यात आली होती या दोघांना उमेदवारी
अजित पवारांसोबत झालेल्या आघाडी नंतर देखील या दोघांनी निवडणुकीत माघार घेतली नसल्याचा पक्षाने ठेवला ठपका
या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला सांगितले असताना पक्षाचे आदेश पाळले गेले नसल्याचं पक्षाकडून तक्रार
प्रभाग क्रमांक १६ हडपसर गाव सातववाडी मध्ये होते दोन उमेदवार
काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा राजीनामा
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सदस्यत्वाचा तिवारी यांनी दिला राजीनामा
काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा
विधानसभा निवडणुकीपासून तिवारी काँग्रेस मध्ये होत्या नाराज
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. नांदेड शहरातील इंदिरा गांधी मैदानावर ही सभा सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. या सभेची नांदेड भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलीय.या सभेसाठी राज्यभरातील भाजपाचे दिग्गज नेते उपस्थितीत राहणार आहेत. नांदेड महानगर पालिकेच्या 81 जागेसाठी भाजपाने 66 उमेदवार या निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहेत.भाजपा सह माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावली आहे. नांदेडच्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरे गावातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री उत्तेश्वर ग्रामदैवत यात्रेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंब दरे गावात मुक्कामी आले आहेत उतेश्वर ग्रामदेवतांच्या यात्रे साठी दरवर्षी ते गावी येतात
यावर्षी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून त्यांनी कुटुंबासह शंभू महादेवाच्या चरणी माथा टेकत दर्शन घेतले.
दरे गावचे ग्रामदैवत असलेल्या उत्तेश्वर यात्रेला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी तसेच कुटुंबीयांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अभिषेक आणि पूजाअर्चा केली.उत्तेश्वर देवस्थानाच्या जिर्णोद्धारासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, आणि याच पार्श्वभूमीवर दरवर्षी कुटुंबीयांकडून अभिषेक केला जातो.आज सकाळी दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सुमारे अकरा वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत
राज्यात महानगर पालिका निवडणुकांच वार सुरु आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहिर होण्याआधीच विभागनिहाय मेळावा घेत शिंदेसेने अलिबागमध्ये मोर्चे बांधणी सुरु आहे. शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी इच्छुक असलेल्या अलिबागच्या आंबेपुर मतदार संघात आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात दळवी यांनी शिवसैनिकांना निवडणुकीला सज्ज होण्याचे अवाहन केल. आमची ताकद सर्वच मतदार संघात आहे. अस दळवी म्हणाले आहेत तर रसिका केणी, दिलिप भोईर आणि मानसी दळवी यांची उमेदवारच आमदार महेंद्र दळवी यांनी जाहिर केली आहे. यामुळे नगर पालिकेनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीत वाद होण्याची चिन्ह आहेत.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात नॉयलॉन मांजाची अवैध विक्री आणि वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेता, तुमसर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पोलिसांनी कटंगी नाका ते गोबरवाही रोड दरम्यान सापळा रचून १८ मोठ्या नॉयलॉन मांजाच्या चक्रींसह ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.अटक केलेला आरोपी नावे किशोर नारायण तुरकर (वय ४४ वर्ष, रा. नाकाडोंगरी),शिवम जयस्वाल (रा. तुमसर), ज्याने हा माल पुरवला होता,यांचा कडून १८ मोठ्या नॉयलॉन मांजाच्या चक्री आणि दुचाकी (एकूण किंमत ६९,००० रुपये). मुद्देमाल जप्त केला आहे.
रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज भाजपा आणि राष्ट्रवादी AP युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ..
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात सकाळी 10.30 वाजता पूजा करून प्रचाराचा होणार शुभारंभ..
माळीवाडा येथून युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन..
सकाळी 11 वाजता दिल्लीगेट येथे होणार भव्य जाहीर सभा..
पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ.संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे, आ.विक्रमसिंह पाचपुते राहणार उपस्थित..
विदर्भात प्रसिद्ध असलेली महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर दीड महिना चालणारी बहिरम यात्रा यंदा तिसऱ्या रविवारी पूर्णतः ‘हाऊसफुल’ ठरली.राज्यभरातू लाखोंच्या संख्येने भाविक व यात्रेकरू बहिरमबुवा च्या दर्शनासाठी यात्रेत दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. या यात्रेत विशेष म्हणजे हंडीतले मटन खाण्यासाठी दरवर्षी राज्यभरातून या ठिकाणी भाविक दाखल होत असतात.काल रविवार असल्याने भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे यात्रा परिसरात वाहनतळाची मोठी अडचण निर्माण झाली.अनेकांना वाहन लावण्यासाठी जागा न मिळाल्याने तसेच भोजन प्रसाद तयार करण्यासाठीही अडचणी आल्याने असंख्य भाविकांना यात्रा परिसरापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आजूबाजूच्या शेतांमध्येच भोजन प्रसाद तयार करावा लागला.
बुलढाणा शहरातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ घडवत भाजपा, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), समाजवादी पार्टी, एमआयएम तसेच काँग्रेस या विविध पक्षांना मोठे धक्के देत असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यात महत्वाच्या भाजपच्या 26 पदाधिकारी व निवडून आलेले नगरसेवकांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे..
तसेच काँग्रेस नगरसेवक, राष्ट्रवादी sp चे नगरसेवक, mim चे पदाधिकारी व उबाठाचे पदाधिकारी यांनी सरळ आपले पक्ष सोडून शिंदे सेनेची साथ धरली आहे... त्यामुळे बुलढाण्यात एकच आवाज शिंदे सेनेचे आ संजय गायकवाड यांचा राहिला आहे.. नगरपालिकेत एकतर्फी सत्ता व बिना विरोधाची एक हाती सत्ता शिंदेसेनेची राहिली आहे हे स्पष्ट झाले आहे..
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या नागपुरात.
मनपा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १५१ अधिकृत उमेदवारांची दुपारी १ वाजता महाकाळकर सभागृह, दत्तात्रय नगर येथे संयुक्त मार्गदर्शक बैठक.
बैठकीत प्रमुख वक्ते हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी सहप्रभारी कुणाल चौधरी, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री प्रभारी नागपूर शहर रणजित कांबळे मार्गदर्शन करणार.
आजी - माजी आमदार प्रदेश काँग्रेस कमेटीचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार.
सोनोग्राफीच्या मासिक अहवालाची ऑनलाईन नोंद करण्यात येणार
महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व सोनोग्राफी सेंटरला ऑनलाईन अहवाल देता येणार
ऑनलाइन अहवाल देण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येणार
सॉफ्टवेअर तयार होईपर्यंत विशेष ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे
विशेष ईमेल आयडी वर सोनोग्राफी सेंटरने अहवालाची नोंद करायची आहे
जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जालन्यात जाहीर सभा होणार आहे. जालना शहरातील फ्रिजर बॉईज मैदानावरती साडेअकरा वाजता ही जाहीर सभा होणार आहे. जालना शहर महानगरपालिकेत भाजपने स्वबळाचा नारा दिला असून 65 जागेवरती भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे याच उमेदवाराच्या प्रचारार्थ आज देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहे.
माजी नगरसेवकांना तिकीट कापलेल्या भाजपच्या बऱ्याच माजी नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात छुपी मोहिम सुरु केलीय
पक्षाचं काम करु नका, सभांना जाऊ नका, अशा छुप्या सुचना काही माजी नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती
भाजपने ५१ माजी नगरसेवकांची तिकीट कापलीय
भाजपचे वरिष्ठ नेते नाराज नगरसेवकांच्या संपर्कात, पक्षविरोधी काम केल्यास होणार कारवाईभाजपचे वरिष्ठ नेते नाराज नगरसेवकांच्या संपर्कात, पक्षविरोधी काम केल्यास होणार कारवाई
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांची पहिली सभा
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विजयी संकल्प सभेचे आयोजन
पुण्यातील कात्रज भागात संध्याकाळी ७ वाजता सभा
पुण्यात होणाऱ्या या सभेत मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष
उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर व कळंब परिसरात रात्रीच्या वेळी अवकाळी पावसाची हजेरी लागली. यावेळी पावसाचा जोर कमी असला तरी रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचले असून अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होणार असून पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील तळा नगर पंचायतीच्या इमारतीचा भुमीपुजन सोहळ्याला अजितदादा उपस्थित राहणार
या दौऱ्यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याला अजितदादा उपस्थित राहणार
रायगडच्या तळा आणि नागोठणे येथे दोन जाहिर सभांच आयोजन करण्यात आल असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत
मंत्री अदिती तटकरे खासदार सुनील तटकरे देखील उपस्थित राहणार
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने दिल्ली - पंजाब पॅटर्न राबवायला सुरुवात केली आहे. मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर, महिलांना मोफत सिटी बस सेवा, प्रभाग 26 मधील ज्येष्ठ नागरिकांना दीड हजार रुपयाची पेन्शन, टँकर मुक्त सोसायटी आणि 20 हजार तरुण तरुणीना रोजगार देण्याचे कार्ड आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी वितरित केले आहेत. रविराज काळे हे आम आदमी पक्षाकडून प्रभाग क्रमांक 26 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आम आदमी पक्षाचे ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हे कार्ड मतदारांना वितरित केले आहेत. मी निवडून आल्यानंतर हे करू शकलो नाही तर माझ्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा असा आव्हान देखील रविराज काळे यांनी मतदारांना केला आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यात परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून,आज सायंकाळच्या सुमारास ,न्याहरखेडा खुर्द देवरे वस्ती परिसरात हिवाळ्यात पावासाने हजेरी लावल्याने या पावसाचा फटका कांद्यासह इतर पिकांना बसणार आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली असून, काढणीस आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी कांदा हा काढून ठेवलेला असल्याने तो झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून आली.
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एमआयएमचे नेतेही महाराष्ट्रातील प्रचारात सक्रीय झाले असून असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावती येथे जाहीर सभा घेतली. त्यावेळी, बोलताना भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरुन पलटवार केला. एक मौलाना म्हणाला, मला चार बायका आणि 19 मुलं आहेत. मी प्रत्येक हिंदू व्यक्तीला आव्हान करते की, ते 19 मुलं जन्माला घालत असतील तर आपण किमान चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, असे भाजप नेत्या नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. आता, अमरावतीत निवडणूक प्रचार सभेदरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणांवर पलटवार केला आहे. तुम्ही चार नाही, आठ मुलं करा, आम्हाला काय करायचं, असे म्हणत नवनीत राणा यांनी हिंदूंना मुले जन्माला घालण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन ओविसी यांनी टीका केली.
धुळे शहरातील गुरुद्वाराच्या गादीवर कोण बसेल? यावरून दोन गटांमध्ये रात्री उशिरा वाद झाला, या वादामध्ये दोन जण जखमी झाले असून, आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, गुरुद्वारा परिसरामध्ये दगडफेक करण्यात आली, तसेच लाठ्या काठीनी हल्ला देखील करण्यात आल, यादरम्यान पोलीस वेळेवर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टाळला, पोलिसांनी या प्रकरणी रणवीर सिंह यांच्यासोबत त्यांच्या साथीदारांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे, बाबा रणवीर सिंह यांनी गुरुद्वारावर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप धुळे शहरातील शिखं बांधवांनी केला होता,
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.