Team India Players Dropped Easy Catches saam tv
Sports

IND VS NEP, Asia Cup 2023: नशीबच फुटकं ना राव! विराट, श्रेयस पाठोपाठ ईशाननेही सोडला सोपा झेल;पाहा VIDEO

Team India Players Dropped Easy Catches: सुरूवातीच्या २१ चेंडूंमध्ये भारतीय खेळाडूंनी ३ सोप्या झेल सोडल्या.

Ankush Dhavre

Virat Kohli,Shreyas Iyer, Ishan Kishan Dropped Easy Catches:

आशिया चषकात भारत विरूद्ध नेपाळ हा सामना सुरू आहे. हा सामना श्रीलंकेच्या कँडीमध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

असं वाटलं होतं की, गेल्या सामन्यात १०४ धावांवर ऑल आउट होणाऱ्या नेपाळचा डाव या सामन्यातही लवकरात लवकर संपेल. मात्र असं काहीच झालं नाही.

भारताचा संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिल्डिंगच्या बाबतीत पुढे आहे. मात्र या सामन्यात असं काही पाहायला मिळालं नाही. सुरूवातीच्या २१ चेंडूंमध्ये भारतीय खेळाडूंनी ३ सोप्या झेल सोडल्या. झेल सोडण्याची सुरुवात श्रेयस अय्यरपासून झाली. त्यानंतर विराट कोहली आणि ईशान किशनने सोप्या झेल सोडल्या.

भारतीय संघाने सोडले ३ सोपे झेल...

श्रेयस अय्यर (Shreyas iyer) -

तर झाले असे की, भारतीय संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आल्या होता. या षटकातील शेवेटचा चेंडू बॅटची कडा घेत स्लिपला असलेल्या श्रेयस अय्यरच्या हातात गेला होता. मात्र श्रेयस अय्यरकडून हा सोपा झेल सुटला. (Latest sports updates)

विराट कोहली (Virat Kohli) -

पुढच्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर नेपाळच्या फलंदाजाला जिवदान मिळाले. आसिफ शेखने कवर पाँईटच्या दिशेने फटका खेळला. मात्र हा चेंडू सरळ विराटच्या हातात गेला. मात्र विराटकडून हा झेल सुटला.

ईशान किशन (Ishan Kishan)-

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने झेल सोडल्यानंतर ईशानने ही नंबर लावला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर भुर्टेलने लेग साईडला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फटका फसला कारण चेंडू बॅटचा कडा घेत ईशान किशनच्या हातात गेला. हा झेल तसा सोपाच होता. मात्र हा झेल त्याला पकडता आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

SCROLL FOR NEXT