हात-पाय दुखतायेत? दुर्लक्ष करू नका, असू शकतात Lung Cancerची लक्षणं; वाचा तज्ज्ञांचे मत

Lung Cancer Symptoms: हिवाळ्यातील हात-पाय दुखणे, बोटे फुगणे आणि नखांमधील बदल ही फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळेत तपासणी महत्त्वाची आहे.
Cold Weather Body Pain
Lung Cancer Symptomsgoogle
Published On

सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. त्यामुळे हात-पायांच्या दुखण्यांच्या समस्या वाढतात. पण तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळ्या समस्या दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. कारण लंग कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ही पहिल्यांदा हाता-पायवर दिसतात. पुढील लेखात आपण याबाबत आपण संपूर्ण माहिती लक्षणे जाणून घेणार आहोत.

फुफ्फुसांच्या कर्करोगाची (Lung Cancer) लक्षणं फक्त खोकला, दम लागणे किंवा वजन कमी होणं इतकीच नसतात. कधीकधी हा कॅन्सर छातीत त्रास सुरू होण्याच्या अगोदरच हाता-पायांवर दिसतो. यालाच पॅरानिओप्लास्टिक आणि व्हॅस्क्युलर लक्षणं म्हटलं जातं. बोटं, नखं, मनगट, गुडघे, त्वचा, स्नायू आणि नसांमध्ये अचानक हे बदल दिसतात.

Cold Weather Body Pain
Cholesterol Symptoms: वाढत्या कोलेस्टेरॉलची 5 लक्षणं दिसतील नखांवर, दुर्लक्ष केल्यानं वाढेल हृदयविकाराचा धोका

काही रुग्णांमध्ये बोटांची टोकं फुगलेली दिसतात, नखं खालच्या दिशेला वाकतात, नखं-त्वचेचा कोपरा वेगळ्या रंगाचा मळकट दिसतो, बोटांमध्ये उष्णता जाणवते. यालाच नेल क्लबिंग म्हणतात आणि ती नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सरशी संबंधित असतात. असं तज्ज्ञ सांगतात. याचं कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमधला असामान्य बदल आणि कनेक्टिव्ह टिश्यूंची वाढ आहे. त्यामुळे छाती संबंधीत आजारांची तपासणी करणं महत्वाचं ठरतं.

मनगट आणि गुडघ्यांमध्ये सूज, वेदना आणि हाडं दुखत असतील तर याला हायपरट्रॉफिक पल्मनरी ऑस्टिओआर्थ्रोपॅथी (HPOA)म्हणतात. जी लंग कॅन्सरशी संबंधित अवस्था आहे. प्रौढांमध्ये अचानक अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टर बऱ्याचदा लपलेल्या लंग कॅन्सर असल्याचा संशय घेतात.

एका बाजूचा पाय अचानक सुजत असेल, गरम वाटत असेल आणि खूप दुखत असेल तर हे डीप व्हेन थ्रोम्बोसिसचं लक्षण असू शकतं. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये रक्त गोठण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखता येतात. ही अवस्था जीवघेणी सुद्धा असू शकते. त्यामुळे लगेचच डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणं आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Cold Weather Body Pain
Gmail Update: आता Gmail ID बदलता येणार! Google आणतोय भन्नाट फीचर, मेलचं झंझट होईल कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com