virat kohli twitter
Sports

Virat Kohli: जगात भारी, विराट कोहली! ODI रँकिंगमध्ये पुन्हा नंबर १, रोहित शर्माची जागा घेतली

Virat Kohli is back as the No.1 ODI batter: भारतीय क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा ICC ODI बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलाय. तब्बल चार वर्षांनंतर कोहलीने हे स्थान मिळवलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपलं अव्वल स्थान पटकावलं आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली नंबर १ फलंदाज बनला आहे. तब्बल 1,403 दिवसांनंतर कोहलीने अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. रोहित शर्माला मागे टाकत विराटने पहिलं स्थान पटकावलंय. तर वनडे रँकिंगमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा क्रिकेट सामना खेळवण्यात येतोय. न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराटने ९१ चेंडूंमध्ये ९३ रन्सची खेळी केली होती. त्यावेळी त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला होता.

विराट कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये

विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सिरीजनंतर कोहलीने गेल्या ५ डावांमध्ये ७४ नाबाद, 135, 102, 65 नाबाद आणि 93 रन्सची खेळी केलीये. विराट जुलै २०२१ नंतर पहिल्यांदा बॅटींग रॅंकिंगमध्ये टॉपवर पोहोचला आहे.

रोहित आणि विराटमध्ये अंकांचा खेळ

आयसीसी रँकिंगच्या आकडेवारीवर नजर टाकली तर विराट कोहली ७८५ पॉईंट्सने पहिल्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर घसरलाय. रोहित ७७५ पॉईंट्सने तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर वनडे रँकिंगच्या स्थानावर डॅरील मिचेल ७८४ पॉईंट्ससह आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal-Budh Yuti: मकर संक्रातीनंतर होणार मंगळ-बुधाची होणार युती; या राशींच्या नशीबी येणार पैसाच पैसा

Baba Mondkar : भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा

पत्नीने लेकीचा ताबा मागितला; रागाच्या भरात नवऱ्याने ८ वर्षीय मुलीला संपवलं, नागपुरात खळबळ

Maharashtra Live News Update: कराडच्या कृष्णा पुलावरून उडी मारून महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

Jio New Recharge Plan: Jio ग्राहकांसाठी खुशखबर; डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा फक्त 75 रुपयांत

SCROLL FOR NEXT