Virat Kohli X (Twitter)
Sports

Virat Kohli Sixer Video : अ‍ॅक्शन रिप्ले! विराटचे लागोपाठ सेम-टू-सेम षटकार, व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli Video : चौथ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने एकाच ठिकाणी सलग दोन सिक्स मारले. विराटच्या या सिक्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यामध्ये विराट कोहली चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे.

Yash Shirke

आयपीएलच्या १८ व्या सीझनला आज सुरुवात झाली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना सुरु आहे. टॉस जिंकत रजन पाटीदारने पहिल्यांदा गोलंदाजी करायचे ठरवले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या संघाने २० षटकांमध्ये एकूण १७४ धावा केल्या.

दुसऱ्या इनिंगला विराट कोहली आणि फिल सॉल्ट दोघे फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरले. दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. स्पेंसर जॉनसन चौथी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये विराटने समोरच्या बाजूला जोरदार सिक्स मारला. दुसऱ्या बॉलवर विराटने त्याच ठिकाणी दुसरा सिक्स मारला.

विराटच्या दोन सिक्स मारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एकाच ठिकाणी दोनदा सिक्स फक्त विराटच षटकार मारु शकतो असे अनेक चाहते म्हणत आहेत. ओव्हरमध्ये पहिल्या दोन बॉल्सवर सिक्स मारल्यानंतर विराटने शेवटच्या बॉलवर पुन्हा फोर देखील मारला. चौथ्या ओव्हरमध्ये त्याने एकूण १७ धावा केल्या.

दरम्यान आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह गाण्यावर ठेका धरला. विराट आणि शाहरुखने मिळून झुमे जो पठाण या गाण्यावर डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट या आयपीएलमध्येही चांगला खेळ करेल असा विश्वास चाहत्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT