virat kohli yandex
Sports

Virat Kohli Record: कसोटीत विराटच किंग! पहिल्याच कसोटीत डॉन ब्रॅडमनचा मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी

Virat Kohli Can Break Don Bradman Record: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नावे आतापर्यंत अनेक मोठमोठे रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. यापैकी काही असे रेकॉर्ड आहेत जे मोडले जाणं जरा कठीणच आहे.

दरम्यान १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेदरम्यान विराट कोहलीला डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका पार पडली. या दौऱ्यावर विराट कोहली वनडे मालिका खेळताना दिसून आला होता. ही मालिका झाल्यानंतर तो पुन्हा लंडनला परतला आहे.

आता १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहली ॲक्शनमध्ये दिसेल. दरम्यान या मालिकेत एक शतक झळकावताच तो सर्वाधिक शतक झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये डॉन ब्रॅडमनला मागे सोडणार आहे.

विराट कोहलीच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ११३ सामन्यांमध्ये २९ शतकं झळकावली आहेत. तर डॉन ब्रॅडमन ने देखील आपल्या कारकिर्दीत २९ शतकं झळकावली होती. १ शतक झळकावत तो डॉन ब्रॅडमनला मागे सोडेल. यासह ३० शतकं झळकावत तो मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉल यांच्या रेकॉर्डची बरोबरी करेल.

बांगलादेशविरुद्ध असा राहिलाय रेकॉर्ड

बांगलादेशविरुद्ध झालेल्या ६ सामन्यांमध्ये विराट कोहलीने ४३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक देखील झळकावले आहेत. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT