Viral moment shows Kohli walking past coach Gautam Gambhir after the Ranchi ODI, fueling speculation of a renewed rift. saam tv
Sports

विराटचं Not Attention तर रोहितशी बाचाबाची; कोहलीनंतर रोहित शर्माचं गौतम गंभीरशी बिनसलं? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा

Cold War Between Kohli and Gambhir? : रांची एकदिवसीय सामन्यानंतर विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील वादाची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये कोहली आणि गंभीरचं बिनसलं असल्याच्या चर्चांनी जोर पकडलाय.

Bharat Jadhav

सोशल मीडियावर विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील वादाची चर्चा रंगत आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर दिसत आहेत. हा व्हिडिओ रांची येथे झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतरचा आहे.

सामना जिंकल्यानंतर कोहली जेव्हा हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूमकडे जात होता, तेव्हा त्याने गंभीरकडे पाहिलं सुद्धा नाही. दोघांमधील शीत युद्ध वाढले आहे, असं एका व्हायरल व्हिडिओमधून दिसतंय. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये रोहित शर्माशी गौतम गंभीर बोलताना दिसतोय. त्यावरून नेटकऱ्यांनी भलताच तर्क काढलाय.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं गंभीरशी जुळत नाही. तिघांमध्ये वाद सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे, की टी-२०आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर दोन्ही सिनीअर खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित केलंय. ते दोघेही २०२७चा वर्ल्ड कप खेळू इच्छित आहेत. परंतु संघ व्यवस्थापन त्यांच्याबाबत त्यांना हमी देत नाहीये. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ ड्रेसिंग रूममधील आहे. यात रोहित शर्मा आणि गौतम गंभीर कोणत्या तरी विषयावर चर्चा करताना दिसत आहेत. पण दोघांच्या चेहऱ्यावरील भाव खूप गंभीर आहेत. त्यानंतर रोहित शर्मानं कोच गंभीरसमोर  दिलेली संतप्त रिअ‍ॅक्शनवरून त्या दोघांमध्ये वाद झाल्याचा अंदाज लावला जातोय. दुसरीकडे रांचीमधील नेट सेशन दरम्यान कोहली आणि गंभीर या दोघांनी चर्चा केली नाही, असं एका वृत्त आहे.

दरम्यान सोशल मीडियावरील चाहत्यांनी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांचा एक व्हिडिओ व्हायरल केलाय. यात सामना संपल्यानंतर कोहली गंभीरला मिठी मारताना दिसत आहे. परंतु ही व्हिडिओ क्लिप अपूर्ण होती. त्यामुळे नेमकं काय घडलं, हे नीट समजत नाहीये.

काय आहे व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ ड्रेसिंग रुममधील आहे. गौतम गंभीर ड्रेसिंग रुमध्ये उभा होता. त्यावेळी विराट कोहली हा ड्रेसिंगमध्ये जात होता. त्यावेळी गौतम गंभीर हा दरवाजाजवळ उभा होता. विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये जात असताना त्याने गंभीरला पाहिलं. त्यावेळी विराटनं आपल्या खिशातील मोबाईल फोन काढला, आणि फोनमध्ये पाहत पाहत त्याने ड्रेसिंग रुमध्ये प्रवेश केला. त्यावेळी गौतम गंभीर तेथेच होता. परंतु विराटनं आपल्या प्रशिक्षकाकडे साधं ढुंकनही पाहिलं नाही. गंभीर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण विराटने त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atal Setu Toll Free: अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना वर्षभर टोल फ्री; महापालिकेची निवडणूक होताच सरकारचा मोठा निर्णय

Konkan Tourism : रत्नागिरीतील 'हा' समुद्रकिनारा पाहताच गोव्याची येईल आठवण, कोकणातील निसर्ग सौंदर्याचा खजिना

EPFO Latest Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता 'या' महिन्यापासून PF तुमच्या UPI अकाउंटमध्ये जमा होणार, पण कसा? वाचा..

Maharashtra Live News Update: चंद्रपूर मनपावर काँग्रेस आणि भाजपचाही दावा

Sprouts Benefits: रोज सकाळी स्प्राउट्स खाल्ले तर काय होईल?

SCROLL FOR NEXT