Virat Kohli x
Sports

Virat Kohli : आयपीएल सुरु असताना विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय

Viral Kohli News Updates : विराट कोहली सध्या आयपीएल २०२५ मध्ये व्यस्त आहे. आयपीएल सुरु असताना त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

Yash Shirke

Virat Kohli News : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या चर्चेत आहे. विराट आयपीएलमध्ये व्यस्त आहे, तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अविभाज्य घटक आहे. बंगळुरूच्या संघाने आयपीएल २०२५ मध्ये एकूण ४ सामने खेळले आहेत. यातील ३ सामन्यांमध्ये आरसीबीचा विजय झाला आहे. या विजयामध्ये विराट कोहलीचा मोलाचा वाटा आहे.

सोशल मीडियावर विराट कोहली नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. पण विराट सोशल मीडियाचा फार कमी वापर करतो. तो मोजक्याच गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर नेहमी जाहिरात संबंधित पोस्ट शेअर करत असतो. त्याने या सर्व जाहिरातीच्या पोस्ट डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे.

Viral Bhayani या पेजवर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवरुन जाहिरातीशी संबंधित पोस्ट डिलीट केल्याचे म्हटले आहे. विराटने या पोस्ट डिलीट का केल्या याचे अधिकृत कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण Viral Bhayani च्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सोशल मीडिया पोस्टवर कमी लक्ष केंद्रित करुन स्वत:च्या आयुष्यावर आणि क्रिकेटवर अधिक लक्ष देण्यासाठी हे विराटने हे पाऊल उचलले असावे असे म्हटले जात आहे. इन्स्टाग्राम अकांउटवरील जाहिरातींच्या पोस्टवरुन विराट कोहलीवर टीका देखील करण्यात आली होती. https://saamtv.esakal.com/topic/ipl

विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने ४ सामन्यांमध्ये ५४.६७ च्या सरासरीने १६४ धावा केल्या आहेत. १४३.८६ इतका विराट कोहलीचा स्ट्राईक रेट आहे. ४ सामन्यात विराटने दोनदा अर्धशतकीय खेळी केली आहे. पुढच्या सामन्यांमध्येही विराटचा फॉर्म टिकून राहिल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

SCROLL FOR NEXT