virat kohli  saam tv
Sports

Virat Kohli Record: ऐतिहासिक सामन्यात किंग कोहलीचा 'विराट' कारनामा! दिग्गजांना मागे सोडत मोडले 'हे' मोठे रेकॉर्ड्स

IND vs WI 2nd Test: विराटने अनेक दिग्गजांना मागे सोडत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Record In 500 Match IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने ४ गडी बाद २८८ धावा केल्या आहेत. या डावात विराट कोहली नाबाद ८७ धावांवर फलंदाजी करतोय. तर रविंद्र जडेजा ३७ धावांवर नाबाद आहे. दरम्यान विराटला आपले ७६ वे शतक पूर्ण करण्यासाठी केवळ १३ धावांची गरज आहे.

भारतीय फलंदाज विराट कोहलीचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. हा सामना त्याच्यासाठी आणखी खास ठरला आहे. कारण त्याने आपल्या ५०० व्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.

असा कारनामा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. या खेळीदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जॅक कॅलिसला मागे सोडलं आहे. आता सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या क्रंमाकावर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

३४३५७-सचिन तेंडुलकर (भारत)

२८०१६- कुमार संगकारा (श्रीलंका)

२७४८३- रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया)

२५९५७- महेला जयवर्धने (श्रीलंका)

२५५४८- विराट कोहली (भारत)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना)

१३४९२- सचिन तेंडुलकर( भारत)

९५०९- महेला जयवर्धने (श्रीलंका)

९०३३- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)

७५३५- ब्रायन लारा( वेस्टइंडीज)

७०९७- विराट कोहली(भारत) (Latest sports updates)

भारतीय संघाची दमदार सुरूवात...

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत २८८ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली.

रोहित शर्माने ८० तर यशस्वी जयस्वालने ५७ धावांची खेळी केली. या दोघांमध्ये १३९ धावांची भागीदारी झाली. विराट कोहली नाबाद ८७ धावांवर तर रविंद्र जडेजा ३६ धावांवर नाबाद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून मिटकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला; शिरसाटांनाही सुनावलं

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT