Virat Kohli DC VS RCB X
Sports

Virat Kohli : 'त्या' कृत्यानंतरही विराट नॉट-आउट कसा? व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा

Virat Kohli Video : दिल्ली विरुद्ध बंगळुरू सामन्यात कुलदीप यादवने केएल राहुलकडे चेंडू फेकला. पण विराटने चेंडू मध्येच अडवला. जर तेव्हा कुलदीप किंवा अक्षरने अपील केले असते, तर विराट बाद झाला असता आणि दिल्लीने सामना जिंकला असता असे म्हटले जात आहे.

Yash Shirke

आयपीएल २०२५ मधील ४६ वा सामना काल (२७ एप्रिल) रोजी दिल्ली कॅपिट्लस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकीय कामगिरी केली. सलग तिसऱ्या सामन्यामध्ये विराटने ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपचा मानकरी बनला. ५१ धावांवर विराट कॅचआउट झाला.

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने एकाच ओव्हरमध्ये जेकब बेथेल (१२ धावा) आणि देवदत्त पड्डिकल (० धावा) अशा दोन विकेट घेतल्या. लगेच चौथ्या ओव्हरमध्ये करुण नायरने आरसीबी कॅप्टन रजत पाटीदारला रनआउट केले. तेव्हा सामना दिल्लीच्या बाजूला झुकला गेला. त्यानंतर विराट कोहली आणि कृणाल पंड्या यांनी परिस्थितीला अनुसरुन खेळ केला आणि आरसीबीचा विजय मिळवून दिला. या सामन्यामध्ये असा एक क्षण आला होता, तेव्हा जर दिल्लीने रिव्ह्यू घेतला असता, तर कोहलीला फक्त १५ धावांवर माघारी परतावे लागले असते.

नेमकं काय घडलं?

१६३ धावांचे लक्ष गाठताना विराट कोहली आणि कृणा पंड्या फलंदाजी करत होते. सातव्या ओव्हरमध्ये विपराज निगम गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विराटने शॉट मारला, जो मिड-विकेटच्या दिशेने गेला. कुलदीप यादवने चेंडू पकडून विकेटकिपर केएल राहुलकडे फेकला. चेंडू राहुलपर्यंत पोहचण्यापूर्वी कोहलीने मध्ये हात घातला आणि चेंडू विपराजकडे फेकला. विराटने चेंडू अडवल्याने कुलदीप यादवने मस्करीत अंपायर्सकडे अपील केले. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जर त्या वेळेस दिल्लीच्या संघाने अपील केले असते, तर विराटला बाद घोषित करण्यात आले असते आणि दिल्लीने सामना जिंकला असता असे नेटकरी म्हणत आहेत.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ :-

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

(सब्स्टिट्युट पर्याय - आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, जॅक फ्रेझर मॅकगर्क, माधव तिवारी, त्रिपुर्ण विजय)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची प्लेईंग ११ :-

विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल

(सब्स्टिट्युट पर्याय - देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, स्वप्निल सिंग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT