Jasprit Bumrah : लेकाच्या फोटोवर नाय नाय ते बरळले, बुमराहच्या बायकोनं ट्रोलर्सचं थोबाड केलं बंद!

Angad Bumrah : मुंबई विरुद्ध लखनऊ या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहच्या लेकाचा, अंगदचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन हावभावावरुन अंगदला ट्रोल करु लागले. या ट्रोलिंगवर बुमराहच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे.
sanjana ganesan
sanjana ganesanX
Published On

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगद काल (२७ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध लखनऊ हा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. या सामन्यात बुमराहने एकाच ओव्हरमध्ये तब्बल ३ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या विकेटनंतर स्टेडियममधील कॅमेरा संजना आणि अंगद यांच्याकडे वळला. कॅमेऱ्यामध्ये छोट्या अंगदचे हावभाव टिपले गेले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. काहीजणांनी हावभावावरुन अंगदची खिल्ली उडवली. अशा ट्रोलर्सना संजनाने खडेबोल सुनावले आहेत.

संजना गणेशनने इन्स्टा स्टोरी शेअर करत मनातील राग व्यक्त केला. ती म्हणाली, 'आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाहीये. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी सर्वपरी प्रयत्न करतो. इंटरनेट हे भयानक ठिकाण आहे. कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियमवर मुलाला आणण्याचे परिणाम मला ठाऊक आहेत. पण मी आणि अंगद जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तेथे आलो होतो. अंगद कोण आहे, त्याला काही त्रास आहे का, तो असा का आहे हे फक्त ३ सेकंदांच्या फुटेजवरुन ठरवत आहेत. आमचा मुलगा व्हायरल इंटरनेटवर व्हायरल झालाय यात आम्हाला काहीही रस नाही.'

Sanjana ganesan insta story
Sanjana ganesan insta storyInsta
sanjana ganesan
'..तुम्ही नालायक, बिनकामाचे आहात'; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, पहलगाम हल्ल्यावरुन भारतीय सैन्यावर केली टीका

'अंगद फक्त दीड वर्षांचा आहे. बाळाबद्दल ट्रॉमा आणि डिप्रेशन सारखे शब्द वापरत आहेत. यावरुनच एक समुदाय म्हणून आपण कुठल्या पातळीवर जात आहोत हे लक्षात येते. ही खूपच दुख:द गोष्ट आहे. तुम्हाला आमच्या मुलाबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहीत नाहीये, सर्वांना विनंती करते तुम्ही तुमची मते तुमच्याकडेच ठेवा', असे संजना गणेशनने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटले आहे.

sanjana ganesan
Rohit Sharma : उन्हात ना बॅटिंग, ना फिल्डिंग; रोहित शर्माची फक्त दोन सिक्सची डील, सोशल मीडिया मीम्स व्हायरल

काल मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये मुंबईने लखनऊवर मात केली. फलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह चमकला. त्याने चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. १६ व्या ओव्हरमध्ये बुमराहने दुसऱ्या चेंडूवर बुमराहने मिलरला, पाचव्या चेंडूवर अब्दुल समदला आणि सहाव्या चेंडूवर आवेश खानला बाद केले.

sanjana ganesan
Pahalgam Attack : उठसूट आमच्याकडे बोट का दाखवता? पुरावा काय? शाहिद आफ्रिदीने भारताला केला सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com