Virat Kohli News Update SAAM TV
Sports

खराब फॉर्मशी झुंजणारा विराट कोहली अखेर बोललाच!; म्हणाला, तर आंतरराष्ट्रीय करिअर...

रनमशीन अशी ओळख असलेल्या विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या तीन वर्षांपासून एकही शतक निघालेले नाही.

Nandkumar Joshi

Virat Kohli Latest News | मुंबई: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज आणि रनमशीन विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याला टीकेचा सामनाही करावा लागत आहे. तब्बल एक हजार दिवस उलटून गेले तरी, त्याच्या बॅटमधून शतकी खेळी साकारली गेली नाही. इतका मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मशी झुंजणारा विराट कोहली अखेर यावर स्पष्ट बोलला.

प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची क्षमता माझ्याकडे नसती तर,आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतका मोठा प्रवास आणि पल्ला गाठू शकलो नसतो, असं विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला.

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली जवळपास तीन वर्षे झाली तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकला नाही. पण यातूनही यशस्वीपणे बाहेर पडणार, असा विश्वास विराटला आहे. कारण २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यामध्ये असलेल्या फलंदाजीतील उणिवा नाहीत, असे त्याला वाटते.

३३ वर्षीय विराट कोहलीनं स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, माझा खेळ कोणत्या स्तरावरचा आहे, हे मी ओळखतो. तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करण्याची क्षमता असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील इतका मोठा पल्ला गाठू शकत नाही. हा माझ्यासाठी केवळ एक टप्पा आहे. पण मी या दबावात राहू इच्छित नाही, असं विराट म्हणाला.

२०१४ मधील इंग्लंड दौऱ्यात बाद होण्याच्या पद्धतीवरही यावेळी विराटनं आपली प्रतिक्रिया दिली. फलंदाजीतील तंत्र सुधारल्यानंतर २०१८ च्या दौऱ्यात जवळपास ६०० धावा केल्या. इंग्लंडमध्ये मी एकाच पद्धतीने बाद होत होतो. त्यावर मला काम करायचं होत आणि त्यातून मला बाहेर पडायचं होतं. आता अशी कोणतीही बाब राहिलेली नाही, असं त्यानं स्पष्ट केलं.

अलीकडच्या काही सामन्यांमध्ये विराट कोहली जवळपास प्रत्येक प्रकारच्या चेंडूवर बाद झाला. याबाबतही त्याने आपले मत मांडले. जर एकाच प्रकारे बाद होत नसेल तर ही माझ्यासाठी चांगली बाब आहे. मी चांगली फलंदाजी करत आहे, हे मला ठाऊक आहे, असंही तो म्हणाला. ज्यावेळी मला वाटत होतं की मी चांगली फलंदाजी करू शकलो नाही, त्यावेळी मी भरपूर मेहनत घेतली. त्यातून मी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. आता असा कोणताही मुद्दा राहिलेला नाही, असं मला वाटतं, असंही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Panvel Tourism : तलावाकाठी येईल चौपाटीवर फिरण्याचा फिल, पनवेलजवळील निसर्गरम्य ठिकाण

Maharashtra Live News Update: आगळगावात चांदणी नदीच्या पूरात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या इसमास तरुणांनी वाचवले

Asia Cup 2025: पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर; यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT