विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांवर भडकले रवी शास्त्री; म्हणाले, या लोकांची...

टीम इंडियाची रनमशीन विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे.
Virat Kohli
Virat KohliSaam Tv

मुंबई: टीम इंडियाची रनमशीन विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. हजार दिवस उलटले तरी, त्याच्या बॅटमधून शतकी खेळी साकारलेली नाही. त्यामुळे सध्या तो टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. यापूर्वी रोहित शर्मा याने विराटला जाहीर पाठिंबा दिला होता. आता टीम इंडियाचे माजी हेड कोट रवी शास्त्रीही त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यांनी टीकाकारांवरच तोफ डागली आहे. या लोकांची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे, असं शास्त्री म्हणाले.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या रवी शास्त्रींनी टीकाकारांना खडेबोल सुनावले आहेत. विराट कोहलीसारखा फिटनेस, जिंकण्याची भूक याबाबतीत तरी त्याच्या तोडीचा कुणी नाही. तो ब्रेकनंतर जबरदस्त पुनरागमन करेल, असा विश्वास रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केला.

Virat Kohli
Team India : टीम इंडियाच्या अडचणी संपेनात, आता ऑलराउंडरलाही दुखापत

आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्ध २८ ऑगस्ट रोजी होणारा सामना हा विराट कोहलीचा १०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाशी भिडणार आहे.

Virat Kohli
Vinod Kambli: विनोद कांबळीचं दुःख ऐकून या उद्योजकाचं हृदय हेलावलं; १ लाख पगाराची दिली ऑफर

शास्त्री म्हणाले की, माझं इतक्यात विराट कोहलीशी (Virat Kohli) काही बोलणे झाले नाही. दिग्गज खेळाडू नेहमीच वेळेवर चमकदार कामगिरी करतो. आशिया चषक स्पर्धेपूर्वी त्याने ब्रेक घेतल्याने फायदा नक्कीच होईल. त्याने ब्रेकच्या कालावधीत याबाबत विचार केला असावा. लोकांची (टीकाकार) स्मरणशक्ती खूपच कमकुवत असते. पाकिस्तानविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली तरी, ते सगळं विसरून जातील, असंही शास्त्री म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com