भारतीय संघातील स्टार खेळाडू विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिकेत सुरु आहे. बेसबॉलची क्रेझ असलेल्या अमेरिकेतही विराट कोहलीचा क्रेझ पाहायला मिळाली आहे.
फॅन्स त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. नुकताच त्याने एक्स प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोवर्सच्या बाबतीत स्टार फुटबॉलपटू नेमार ज्यूमिअरला मागे सोडलं आहे. यासह तो एक्स प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा दुसराच अॅथलिट ठरला आहे.
विराट कोहलीची एक्स प्लॅटफॉर्मवरील फॉलोवर्सची संख्या पाहिली, तर त्याचे ६.३५ कोटी फॉलोवर्स आहेत. तर ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारचे एक्स प्लॅटफॉर्मवर ६.३४ कोटी इतके फॉलोवर्स आहेत. काही लाखांच्या फरकाने विराट नेमारहून पुढे निघाला आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोवर्सच्या बाबतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. रोनाल्डोचे एकूण ११.१४ कोटी इतके फॉलोवर्स आहेत.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा माजी खेळाडू रॉस टेलरने विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. त्याने एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले होते की, 'खेळाडू आता सोशल मीडियावर प्रोडक्ट्सची मार्केटिंग करत आहेत. कोहली एक सुपरस्टार आहे. एक जगप्रसिद्ध खेळाडू आहे. २००८ मध्ये कोणी असा विचार तरी केला होता का? सोशल मीडियावरील अस्तित्वाच्या बाबतीत तो रोनाल्डो आणि मेसीच्या बरोबरीला आहे.'
विराट कोहलीचे एक्स प्लॅटफॉर्मवर ६३.५ मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. तसेच इंस्टाग्रामवर त्याचे २२५ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. यासह फेसबुकवर त्याचे ५० मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्याच्या फॉलोवर्ची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तो आशियातील सर्वाधिक फॉलो केला जाणारा खेळाडू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.