Virat Kohli becomes first Indian to complete 200 Million instagram followers. Saam Tv
क्रीडा

सोशल मीडिया 'किंग' कोहलीने गाठला इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विराट आकडा

कोहलीच्या मैदानावरील कामगिरीने त्याचा सोशल मीडियावरील प्रभाव मात्र कमी झालेला नाही. हे मात्र प्रकर्षाने सातत्याने जाणवत आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली (Virat Kohli Latest Marathi News) : क्रिकेटच्या स्टेडियम बराेबरच समाज माध्यमात (Social Media) लाेकप्रिय असलेला भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) इंस्टाग्रामवर (instagram) 200 दशलक्ष फॉलोअर्स (200 दशलक्ष) झाले आहेत. इतक्या माेठ्या संख्येने फ्लाॅलाेअर्स असणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला. जगातील दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) (४५० दशलक्ष) आणि लिओनेल मेस्सी (Lionel Messi) (३३३ दशलक्ष) यांच्यानंतर विराट कोहली हा जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला खेळाडूंच्या पंगतीत जाऊन बसला आहे. (Virat Kohli becomes first Indian to complete 200 Million instagram followers)

कोहली पाठोपाठ ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार (Neymar) (175 दशलक्ष) तसेच चौथ्या क्रमांकावर लेब्रॉन जेम्स (१२३ दशलक्ष) आहे. क्रिकेटपटूंमध्ये कोहलीला सर्वाधिक फॉलो केले जात आहे. "200 मिलियन स्ट्राँग. इंस्टा फॅमच्या तुमच्या सर्व समर्थनाबद्दल धन्यवाद," असे कोहलीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या ICC T20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर कोहलीने T20I कर्णधारपद सोडले. या स्पर्धेत भारताची कामगिरी लाजिरवाणी झाली हाेती. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले. दक्षिण आफ्रिकेत भारताच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले. बीसीसीआयने रोहितची कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान कोहलीच्या मैदानावरील कामगिरीने त्याचा सोशल मीडियावरील प्रभाव मात्र कमी झालेला नाही. हे मात्र प्रकर्षाने सातत्याने जाणवत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT