Virat Kohli Anushka Sharma crying after RCB win  Saam TV
Sports

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Virat Kohli & Anushka Sharma crying : विराट कोहलीचे सेलिब्रेशन बघण्यासारखं होतं. त्याला इतका आनंद झाला, की भर मैदानात कोहली रडला. त्याला पाहूनही अनुष्का शर्मालाही अश्रूंचा बांध फुटला. दोघांच्याही भावना कॅमेऱ्यात कैद झाल्या.

Satish Daud

आयपीएल २०२४ स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अतिशय रंगतदार सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात आरसीबीने चेन्नईवर २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने प्ले-ऑफचे तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे चेन्नईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने चेन्नईसमोर विजयासाठी २१९ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या. एकवेळ चेन्नईचा संघ सामन्यात विजय मिळवणार असं वाटत होतं. पण रचिन रविंद्रचा रन आऊट सामन्याला कलाटणी देणारा ठरला.

त्याचबरोबर फाफ ड्यू प्लेसिसने घेतलेला अफलातून झेल आणि रचीन रवींद्रचा रन आऊट हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला. शेवटच्या षटकात यश दयालने भेदक गोलंदाजी करत चेन्नईला १९१ धावांवरच रोखलं आणि प्ले-ऑफचं तिकीट पक्क केलं.

विराट कोहली, अनुष्का शर्मा दोघेही रडले

आरसीबीच्या विजयानंतर चाहत्यांनी मोठा जल्लोष केला होता. विराट कोहलीचे सेलिब्रेशन बघण्यासारखं होतं. त्याला इतका आनंद झाला, की भर मैदानात कोहली रडला. त्याला पाहूनही अनुष्का शर्मालाही अश्रूंचा बांध फुटला. दोघांच्याही भावना कॅमेऱ्यात कैद झाल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शेवटच्या षटकात यश दयालने फिरवला सामना

शेवटच्या षटकात चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी १७ धावांची गरज होती. चेन्नईकडून महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जाडेजा मैदानावर फलंदाजी करत होते. फाफ ड्यू प्लेसिसने गोलंदाजीची कमान यश दयालकडे सोपावली. धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला.

पण दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करत यश दयालने धोनीला आऊट केल. तिथेच सामना फिरला. त्यानंतरच्या ५ चेंडूत यश दयालने केवळ १ धाव दिली आणि सामना आरसीबीच्या झोळीत टाकला. या विजयानंतर विराट कोहली, अनुष्का शर्माच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT