rohit sharma and virat kohli  saam tv
Sports

SA vs IND Test Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित-विराटचं खेळणं कठीण! कोण होणार संघाचा पुढील कर्णधार?

Team India New Captain: या मालिकेत काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.

Ankush Dhavre

India Tour Of South Africa: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका सुरु असताना बीसीसीआयने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

आगामी वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेत काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.

भारत दक्षिण आफ्रिका मालिकेचा प्रारंभ १० डिसेंबरपासून होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेन्चुरियनच्या मैदानावर रंगणार आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जूनदरम्यान केपटाऊनच्या मैदानावर रंगणार आहे.

विराट, रोहितला मिळणार विश्रांती?

शुक्रवारी (१४ जुलै) बीसीसीआयने या दौऱ्याचं वेलकपत्रक जाहीर केलं आहे. आता लवकरच १५ सदस्यीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवले जाऊ शकते. यावेळचा वनडे वर्ल्डकप भारतात रंगणार आहे. ५ ऑक्टोबरपासून सूर होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे.

सकाळच्या वृत्तानुसार सतत क्रिकेट खेळत असल्याने वर्क लोड कमी करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. तर यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानला संधी दिली जाऊ शकते. तर नवदीप सैनी आणि मुकेश कुमार या गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ:

शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर,नवदीप सैनी, मुकेश कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

असं आहे वेळापत्रक..

१० डिसेंबर २०२३: पहिला टी -२० सामना, डर्बन

१२ डिसेंबर २०२३: दुसरा टी -२० सामना, ग्केबेरहा

१४ डिसेंबर २०२३ : तिसरा टी -२० सामना, जोहान्सबर्ग

१७ डिसेंबर २०२३: पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग

१९ डिसेंबर २०२३ : दुसरा वनडे सामना, ग्केबेरहा

२१ डिसेंबर २०२३: तिसरा वनडे सामना, पार्ल

२६ ते ३० डिसेंबर, २०२३: पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन

३ जानेवारी ते ७ जानेवारी, २०२४: दुसरा कसोटी सामना, केपटाऊन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT