virat kohli  
Sports

Virat Kohli Best Innings: चेज मास्टर विराट! '८२' सोबत आहे खास कनेक्शन, विराटच्या फॅन्सला माहित असायलाच हवं ..

Virat kohli 82 Connection: या खेळीनंतर विराट आणि ८२ या आकड्याचं कनेक्शन समोर आलं आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli 82 Runs Knock: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून जर त्याची कामगिरी पाहिली तर त्याने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कामगिरी पाहायला मिळाली आहे.

हाच फॉर्म त्याने आयपीएल स्पर्धेत देखील सुरु ठेवला आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.

या सामन्यात त्याने नाबाद ८२ धावांची खेळी केली आणि संघाला सामना जिंकून दिला. आता या खेळीनंतर विराट आणि ८२ या आकड्याचं कनेक्शन समोर आलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे फॅन असाल तर तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेला २०२२ टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना नक्कीच पाहिला असेल. या समान्यत भारतीय संघातील मुख्य फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते.

हाय वोल्टेज सामना, मुख्य फलंदाज बाद मात्र तरीही क्रिकेट चाहत्यांच्या विजयाची आस होती कारण विराट कोहली खेळपट्टीवर टिकून होता. पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर विराटने तुफान फटकेबाजी केली आणि भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. (Latest sports updates)

चिन्नास्वामीच्या मैदानावर केलेल्या ८२ धावांच्या खेळीनंतर आता विराटने मोहालीच्या मैदानावर केलेली खेळी देखील चर्चेत आली आहे. विराटने २०१६ मध्ये मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात ८२ धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

त्यावेळी देखील ऑस्ट्रेलिया संघात जेम्स फॉल्कनर, नॅथन कुल्टर नाईल, शेन वॉटसन आणि जोश हेजलवूड सारखे गोलंदाज होते. या गोलंदाजांचा टिचून सामना करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास काढून घेतला होता.

आरसीबीचा जोरदार विजय..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अप्रतिम गोलंदाजी केली.

मुंबईला या डावात १७२ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसीसने चांगली सुरुवात केली. दोघांनी १४८ धावांची भागीदारी केली. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT