Virat Kohli Records: तुफानी खेळी करत विराटने तोडला रोहीतचा मोठा रेकॉर्ड! IPL मध्ये असा कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज

virat Kohli Breaks Rohit Sharma Record: विराट कोहलीने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.
Virat Kohli
Virat KohliTwitter
Published On

Virat Kohli Records In IPL: एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात १७२ धावांचा पाठलाग करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला.

यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२३ स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात नाबाद ८२ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.

Virat Kohli
Memes On Rohit Sharma: 'तू काय प्रेग्नेंट आहेस का?' हिटमॅनचा 'तो' फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर मिम्सचा महापूर...

या सामन्यात विराट कोहलीची चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसीसने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

दोघांनी मिळून १४८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान ८२ धावांवर नाबाद राहणाऱ्या विराटने रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडून काढला आहे. हे विराटच्या आयपीएल कारकिर्दीतील ४४ वे अर्धशतक ठरले.

दरम्यान २३ वेळा त्याने १५० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे. याबाबतीत त्याने रोहितला मागे सोडलं आहे.

रोहित शर्माने १५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २२ अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत एमएस धोनी तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने १९ वेळेस हा कारनामा केला होता. तसेच सुरेश रैनाने देखील १९ वेळेस हा कारनामा केला आहे. (Latest sports updates)

Virat Kohli
MI vs RCB IPL Match 2023: तिलक वर्माची झुंजार खेळी; मुंबई इंडियन्सकडून आरसीबीला दिले 172 धावांचे आव्हान

पहिल्याच सामन्यात मुंबईचा दारुण पराभव..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अप्रतिम गोलंदाजी केली.

मुंबईला या डावात १७२ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसीसने चांगली सुरुवात केली. दोघांनी १४८ धावांची भागीदारी केली. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com