MI vs RCB IPL Match 2023: तिलक वर्माची झुंजार खेळी; मुंबई इंडियन्सकडून आरसीबीला दिले 172 धावांचे आव्हान

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आरसीबीला 172 धावांचे आव्हान दिले.
MI vs RCB IPL Match 2023
MI vs RCB IPL Match 2023IPL/twitter

MI vs RCB IPL Match 2023: इंडियन प्रीमियर लीगचा पाचव्या सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आरसीबीला 172 धावांचे आव्हान दिले. (Latest Marathi News)

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सिराजने मुंबई इंडियन्सला पहिला झटका दिला. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूत ईशान किशनला सिराजने गुंडाळले.

ईशानने १३ चेंडूत १० धावा कुटल्या. तर मुंबईला कॅमरन ग्रीनच्या रुपाने दुसरा झटका बसला. कॅमरन ५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा देखील स्वस्तात माघारी परतला. रोहितने १० चेंडूत अवघी एकच धाव काढून बाद झाला. (Latest Match)

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ९ व्या षटकात सूर्यकुमार यादव अवघ्या १५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर तिलक शर्मा आरसीबीला एकटात भिडला. तिलक शर्मा आरसीबीशी भिडत असताना नेहल साथ देत होता.

मात्र, १४ व्या षटकात कर्ण शर्माने नेहलला बाद केले. नेहलने २१ धावा कुटल्या. टिम डेव्हिडच्या ३ धावा झाल्या होत्या, तेव्हा तिलकला अर्धशतक होण्यासाठी ५ धावा हव्या होत्या. त्यानंतर तिलकने १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूत षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. टिम डेव्हिडही स्वस्तात माघारी परतला.

MI vs RCB IPL Match 2023
SRH VS RR Result: घरच्याच मैदानावर हैदराबादला राजस्थानने लोळवलं! एकतर्फी सामन्यात ७२ धावांनी मिळवला विजय

अठराव्या शतकात ऋतिक शौकीनही ५ धावा करून तंबूत परतला. हर्षलने त्याला बाद केले. त्यानंतर अखेरच्या षटकात तिलक आणि अरशदने डाव सावरत आरसीबीला १७२ धावांचे आव्हान दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com