

मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका तथा माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आलंय. आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. भिंवडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकंच पद रद्द करण्यात आलंय. शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागासवर्ग प्रवर्ग (महिला) या राखीव जागेवर निवडून आलेल्या फरजाना मोहम्मद सुलेमान अन्सारी (फरजाना सय्यद) यांचे रद्द करण्यात आलंय. त्यामुळे भिवंडीच्या राजकीय वर्तुळात या कारवाईची चर्चा सुरू झाली.
भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केलाय. प्रभाग क्रमांक 4-अ मधील नगरसेवकपदाची जागा रिक्त घोषित करण्यात आलीय. भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने 12 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित केलेले अन्सारी जातीचे इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले होते.
समाजवादी पक्षाच्या पराभूत उमेदवार इरम अहमद हुसैन अन्सारी यांनी या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदवत तक्रार दाखल केली होती. शाळा सोडल्याच्या दाखल्यांवरील जात नोंदींसह सादर करण्यात आलेले पुरावे, दक्षता पथकाच्या अहवालाची तपासणी केल्यानंतर समितीने हा निर्णय घेतला होता.
जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या आधारे महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 10 (1)(अ) तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीविषयक कायद्यातील तरतुदींनुसार फरजाना अन्सारी यांना नगरसेवकपदासाठी अपात्र ठरविलंय. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द मानण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटलंय.
त्यानुसार प्रभाग क्रमांक 4-अ मधील जागा रिक्त घोषित करून या आदेशाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी राज्य निवडणूक आयोग, नगरविकास विभाग आणि संबंधित शासकीय कार्यालयांकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेत. फरजाना इरफान सय्यद ऊर्फ फरजाना मोहम्मद सुलेमान अन्सारी यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलीय. उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळतो का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.