sachin tendulkar with virat kohli  saam tv
क्रीडा

IND vs WI 2nd Test: काय योगायोग म्हणावा हा! विराटच्या 29 व्या सेंच्युरीचं अन् क्रिकेटच्या देवाचं आहे खास कनेक्शन

Virat Kohli 29th Century: या शतकी खेळीसह एक मोठा योगायोग घडला आहे. जो यापूर्वी कधीच घडला नव्हता.

Ankush Dhavre

Virat Kohli Sachin Tendulkar 29th Century: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्कच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने दमदार कामगिरी करत शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले आहे.

हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २९ वे शतक ठरले आहे. दरम्यान या शतकी खेळीसह एक मोठा योगायोग घडला आहे. जो यापूर्वी कधीच घडला नव्हता.

ऐतिहासिक सामन्यात विराटचे शतक..

विराट कोहली हा आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या ऐतिहासिक सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २९ वे शतक ठरले आहे.

तर गेल्या ५ वर्षात परदेशात झळकावलेले हे त्याचे पहिलेच कसोटी शतक आहे. त्याने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पर्थ कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नव्हते. मात्र त्याने या विश्रांतीला पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर येऊन पूर्णविराम दिला आहे. यापू्र्वी सचिन तेंडुलकरने देखील पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर आपल्या कसोटी कारकिर्दीतील २९ वे शतक पूर्ण केले होते.

२००२ मध्ये झळकावले होते २९ वे शतक...

कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतक झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपले २९ वे शतक पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर झळकावले होते. २००२ साली भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होती.

मालिकेतील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर सुरू होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने ११७ धावांची खेळी केली होती. त्याने हे शतक ९३ व्या कसोटी सामन्यात पूर्ण केले होते. यासह त्याने सर डॉन ब्रॅडमनच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. (Latest sports updates)

विराटच्या नावे खास विक्रमाची नोंद..

या शतकी खेळीसह विराट कोहलीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ५०० सामने झाल्यानंतर सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्याने आतापर्यंत ७६ शतके झळकावली आहेत. तर सचिन तेंडुलकरने ७५ शतके झळावली आहेत.

५०० सामने झाल्यानंतर सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज..

विराट कोहली- ७६ शतके

सचिन तेंडुलकर - ७५ शतके

रिकी पॉंटीग - ६८ शतके

जॅक कॅलिस - ६० शतके

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT