viral catch video instagram
Sports

Viral Catch Video: ना हाताने, ना पायाने, गड्याने कॅच पकडली चक्क पाठीने; पाहा Video

Viral Cricket Video: पठ्ठ्याने चक्क पाठीच्या साहाय्याने कॅच पकडली आहे,ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Viral Catch Video:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू असताना टेनिस क्रिकेट स्पर्धेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये यष्टिरक्षक झेल टिपताना दिसतोय. मात्र त्याची झेल टिपण्याची स्टाईल पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्यामुळे कुठल्याही यष्टिरक्षकाने टिपलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल म्हटला जात आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डाव्या हाताचा गोलंदाज ऑफ कटर बॉल टाकतो. हा बॉल टप्पा पडताच बाहेरच्या दिशेने जातो. या बॉलवर फलंदाज हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा हा प्रयत्न फसतो. कारण बॉल बॅटची कडा घेत यष्टिरक्षकाकडे जातो. बॉल यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हला लागतो त्यावेळी असं वाटतं की हा झेल सुटेल. मात्र असं काहीच होत नाही. (Latest sports updates)

बॉल त्याच्या पाठीवर जाऊन थांबतो. त्यानंतर यष्टिरक्षक आपल्या दोन्ही हातांच्या साहाय्याने पाठीवरचा बॉल थांबवतो. त्यावेळी संघात इतर सहकारी एकच जल्लोष करू लागतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे. तसेच नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या युजरने लिहिलंय की, हा आतापर्यंतचा कुठल्याही यष्टीरक्षकाने टिपलेला सर्वोत्तम झेल आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT