World Cup Playing 11: विराट पुन्हा बनला वर्ल्डकप संघाचा कर्णधार! रोहित आऊट; पाहा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेली WC ची प्लेइंग ११

Cricket Australia World Cup Playing 11 Prediction: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची प्लेइंग ११ निवडली आहे.
virat kohli
virat kohlisaam tv news
Published On

World Cup Playing 11:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील समाप्त झाले आहेत. येत्या बुधवारी (१५ नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर सेमीफायनलचा दुसरा सामना १६ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमर रंगणार आहे. दरम्यान साखळी फेरीतील सामन्यांच्या समाप्तीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची प्लेइंग ११ निवडली आहे.

या खेळाडूंना दिलं स्थान..

क्रिकेट ऑस्टेलियाने सोमवारी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील बेस्ट प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. तर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला या संघात स्थान देण्यात आलं आहे.

तसेच भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत फलंदाजी करताना ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब अशी की त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. (Latest sports updates)

virat kohli
IND vs NZ Semi Final: सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित? न्यूझीलंडची डोकेदुखी वाढवणारी आकडेवारी एकदा पाहाच

दक्षिण आफ्रिकेच्या ३ खेळाडूंचा समावेश....

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या प्लेइंग ११ मध्ये, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी ३-३ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात क्विंटन डी कॉक, एडेन मार्करम आणन मार्को यान्सेनचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने या स्पर्धेत फलंदाजी करताना ४ सामने खेळले आहेत. तर मार्को यान्सेन हा दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंचा समावेश...

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या या संघात ऑस्ट्रेलियातील ३ खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. ज्यात डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाचा समावेश आहे. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने २०१ धावांची तुफानी खेळी केली होती.

या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. तर अॅडम झाम्पा या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.

रचिन रविंद्रला दिलं संघात स्थान..

न्यूझीलंडच स्टार युवा फलंदाज रचिन रविंद्रने अप्रतिम फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फलंदाजाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ३ शतकं झळकावली आहेत. श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मधुशंकाची १२ वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

virat kohli
World Cup : नऊ वर्षानंतर कोहलीने घेतली पहिली विकेट; अनुष्कानं दिलं स्टँडिंग ओव्हेशन; आवाज देत केलं जोरदार सेलिब्रेशन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com