Vinesh Phogat Grand Welcome on Delhi Airport:  Saamtv
Sports

Vinesh Phogat Grand Welcome: 'संघर्षकन्या' विनेश फोगाट मायदेशी परतली! जंगी स्वागत पाहून भावुक झाली, ढसढसा रडली; पाहा हृदयस्पर्शी VIDEO

Vinesh Phogat Grand Welcome on Delhi Airport: पॅरिसची ऑलिम्पिक स्पर्धा गाजवून आलेल्या या संघर्षकन्येचे देशवासियांनी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत केले. यावेळी विनेशच्या चाहत्यांसह, तिचे कुटुंबीय, मित्रमंडळी, गावकरी तसेच क्रिडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. १७ ऑगस्ट २०२४

Vinesh Phogat Video: पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा संपवून भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट आज मायदेशी परतली. विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनलआधीच अपात्र घोषित केल्यानंतर अख्खा देश हळहळला होता. विनेशच्या जिगरबाज खेळीचे, तिच्या संघर्षाचे देशभरातून कौतुक झाले. मात्र याबाबत विनेशने जाहीरपणे कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आज मायदेशी परतल्यानंतर विनेशचे दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. यावेळी देशवासियांचं प्रेम पाहून विनेशही भावुक झाली अन् आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.

'संघर्षकन्या' मायदेशी परतली!

शनिवार (17 ऑगस्ट )रोजी सकाळी 10:45 च्या सुमारास,स्टार कुस्तीपटू विनेश फोगटचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. पॅरिसची ऑलिम्पिकस्पर्धा गाजवून आलेल्या या संघर्षकन्येचे देशवासियांनी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत केले. यावेळी विनेशच्या चाहत्यांसह, तिचे कुटुंबीय, मित्रमंडळी, गावकरी तसेच क्रिडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. देशवासियांचे हे प्रेम अन् आई, मित्रांना पाहून विनेशही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

जंगी स्वागत अन् भावूक क्षण!

सोबतच रोहतकचे काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डाही पोहोचले होते, त्यांनी विनेशला विमानतळाबाहेर आणले. यावेळी विमानतळावर विनेश फोगटच्या नावाने जोरदार घोषणाबाजी होत होती. तसेच ढोल ताशांच्या गजराने संपूर्ण विमानतळ दणाणून गेले होते. यावेळी विनेशने तिचे सहकारी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांना पाहिल्यानंतर तिला अश्रु अनावर झाले. तिने दोघांनीमिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. विनेशची आई देखील तिथे होती आणि तिने आपल्या लाडक्या मुलीचा चेहरा हातात घेतला आणि त्याचे चुंबन घेतले आणि ती देखील रडू लागली. यावेळी संपूर्ण विमानतळावर भावुक परिस्थिती पाहायला मिळाली.

दिल्लीत पोहोचताच ढसढसा रडली!

केवळ 10 दिवस आधी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला अपात्र करण्यात आले त्यानंतर पुढचा आठवडाभर रंगलेल्या न्यायालयीन लढाईत विनेश फोगटसह संपूर्ण देशाला पराभवाचा सामना करावा लागला. अवघ्या 100 ग्रॅमने वजन जास्त असल्याने ती केवळ अंतिम फेरीतूनच नाही तर संपूर्ण स्पर्धेतूनही अपात्र ठरला. CAS या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या कोर्टानेही हे विचित्र नियम मान्य केले आणि विनेशचे अपील फेटाळले आणि तिचे रौप्यपदक हुकले. असे असतानाही विनेशच्या मायदेशी परतल्यावर तिच्या स्वागताची तयारी आधीच करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT