Sports

Vinesh Phogat Letter: चांगल्या माणसांचे देव कधीच...; विनेश फोगाटचं डोळ्यात पाणी आणणारं तीन पानी पत्र

Vinesh Phogat Letter: रौप्यपदकाने हुलकावणी दिल्याने नाराज झालेल्या विनेशने एक भावनिक पत्र लिहिलंय. विनेशने तीन पानी पत्रात काय लिहिलं आहे, एकदा वाचा.

Bharat Jadhav

भारतीय महिला कुस्तीपटू विनेशला पॅरिस ऑलिम्पिकच्या रौप्यपदकाने हुलकावणी दिली. त्यानंतर आता विनेशने आपल्या भावना एका पत्रातून व्यक्त केल्यात.पैलवान असलेल्या विनेशचं पात्र वाचून धिपाड्या आणि ५६ इंचाची छाती असेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात देखील पाणी येईल. विनेशच्या आयुष्यात किती दु:ख होतं आणि तिच्यासाठी हे पदक किती महत्त्वाचं होतं हे या पात्रातून अख्या देशाला कळलंय.

काही तासापुर्वी विनेश फोगाटच्या प्रशिक्षकांनी वजन कमी करण्याचा प्रवास सांगितला. त्यावेळी विनेशला होणारा त्रास त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून सांगितला होता. त्या पोस्टमध्ये प्रशिक्षकाने विनेशने आपल्याला नैराश्यातून बाहेर काढलं होतं, त्यांच्यात झालेला भावनिक संवाद देखील त्यांनी त्यात लिहिला होता. आता विनेश फोगाटने एक पत्र लिहित आपल्या आयुष्यातील संघर्ष कसे हातून मागे लागलेत हे सांगितलं आहे.

विनेश फोगटने आपल्या पत्रात महत्वाच्या घटनांचा उल्लेख केलाय. " माझे बाबा बस ड्रायव्हर होते. माझ्या बाबांचे एक स्वप्न होते. आपल्या मुलीने विमानात बसून प्रवास करावा आणि आपण ते खाली रस्त्यावरून पाहावं. बाबा असं का म्हणायचे, हे सुरुवातीला मला समजत नव्हतं. काही वेळा मी चेष्ठाही केली. पण बाबा नेमके काय बोलत होते, ते आता मला समजत आहे. बाबांचे हे एक स्वप्न मी पूर्ण करू शकले. पण आई मात्र आमची साधी आहे.

तिच्या अशा काहीच अपेक्षा आमच्याकडून नव्हत्या. आई एकच गोष्ट सांगायची, चांगल्या माणसांचे देव कधीच वाईट करत नाही. पुढे आपल्या वडिलांचे निधन झाल्याचं सांगत विनेशने आईला आजारपण आले असताना घरातील परिस्थिती कशी होती हेदेखील सांगितलं. वडिलांचे निधन झाले तेव्हा आम्ही लहान होतो. वडिलांच्या निधनानंतर काही महिन्यांतच आईला कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यावेळी तिचा संघर्ष आम्ही पाहिला.

यात आपलं बालपण हिरावल्या गेल्याच तिने सांगितलं. आम्हाला बालपण जगताच आले नाही. पण या गोष्टीने एक मात्र शिकवले, ती म्हणजे कणखरता. आईने आम्हाला शिकवले की, परिस्थिती कशीही असो आपण हार मानायची नाही. तिची हीच गोष्ट मला प्रेरणा देऊन गेली. त्यामुळे मी खचली नाही. संघर्ष सुरुच ठेवला आहे." असा विनेशने आपल्या पत्रात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT