Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावर पॉक्सो कायद्यासह दोन प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर ते शनिवारी म्हणाले, ''मी गुन्हेगार म्हणून राजीनामा देणार नाही. माझा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. माझी कोणतीही तक्रार नाही. मी पूर्णपणे निर्दोष आहे. तपास यंत्रणा मला जिथे बोलावेल तिथे मी जायला तयार आहे. (Latest Marathi News)
ते म्हणाले की, ''माझ्यावर अनेक महिन्यांपासून सातत्याने आरोप केले जात आहेत. मी आणि माझे कुटुंब अडचणीत आहोत. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. या लोकांची विधाने बदलत राहतात.'' (Delhi News)
कुस्तीपटूंना देण्यात येणार सुरक्षा
कुस्तीपटूंना सुरक्षा देण्यात येणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिस लवकरच अल्पवयीन तक्रारदाराशी संपर्क साधतील आणि त्यांचा जबाब नोंदवतील. एका अल्पवयीन खेळाडूसह एकूण 7 खेळाडूंनी ब्रिजभूषण शरणसिंह विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. ब्रिजभूषण यांच्यावर 2012 ते 2022 या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
प्रियंका गांधी यांनी कुस्तीपटूंची घेतली भेट
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) शनिवारी सकाळीच आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना भेटायला पोहोचल्या. यादरम्यान प्रियंका गांधी म्हणाल्या, ''दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची प्रत अद्याप मिळालेली नाही, जेणेकरून त्यात कोणत्या कलमांचा समावेश आहे, हे कळू शकेल. एफआयआर नोंदवला असेल तर दाखवावा. या व्यक्तीवर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यांच्या पदावर असताना चौकशी करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.