Vinesh Phogat Saam Digital
क्रीडा

Vinesh Phogat: रौप्य पदकाची पुन्हा हुलकावणी; विनेश फोगाटबाबतचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलला

Bharat Jadhav

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटच्या भवितव्याचा निर्णय पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलाय. पॅरिस ऑलिम्पिकमधील अपात्रतेविरुद्ध लवाद न्यायालयात (सीएएस) अपील करणाऱ्या विनेश फोगाटला रौप्य पदकासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. रौप्य पदकाची मागणी करत विनेशने स्व: ताने अपील केले होते. त्यावर ९ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी निर्णय दिला जाईल, असे सांगण्यात आलं.

परंतु तो पुन्हा १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर १० ऑगस्टलाही निर्णय देण्यात आला नाही. तर १३ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा सीएएसने तीन दिवसानंतर निकाल दिला जाणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा निर्णय आता १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता (भारतीय वेळेनुसार) जाहीर केला जाईल.

गेल्या आठवडाभरापासून देशातील आणि जगातील मीडिया आणि सोशल मीडियात विनेश फोगाटचा मुद्दा चर्चेत आहे. याची सुरुवात ६ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकमधील सामन्यापासून सुरू झाली. महिलांच्या ५० किलो गटात विनेश फोगाटने पहिल्या फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत-१ युई सुसाकीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. यानंतर विनेशने आपला उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही सहज जिंकला आणि संध्याकाळी उपांत्य फेरीत क्युबाच्या गुझमन लोपेझचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली. यासह तिचे पदकही निश्चित झाले, सुवर्ण किंवा रौप्य पदक विनेशला मिळेल असं वाटत होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ ऑगस्टला फायनल होणार होती, मात्र नियमानुसार फायनलपूर्वी सकाळी पुन्हा वजन मोजावे लागले. येथेच विनेशचे वजन निर्धारित ५० किलो वजनापेक्षा १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर UWW च्या नियमानुसार तिला अपात्र घोषित करून अंतिम फेरीतून बाहेर करण्यात आले. UWW चे नियम इतके कडक आहेत की केवळ फायनलच नाही तर त्यांचे सर्व निकाल रद्द करण्यात आले. विनेशला संपूर्ण स्पर्धेतून वगळत तिला मिळणारे संभाव्य रौप्य पदकही काढून घेतले.१२ पैलवानांमध्ये त्याला शेवटचे स्थान मिळालं होतं.

अपात्र ठरवल्यानंतर विनेशने ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सीएएसमध्ये या नियमाविरुद्ध आणि निकालाविरुद्ध याचिका दाखल केली. फायनल थांबवून तिला तिची जागा परत मिळावी अशी विनेशची मागणी होती, तिच्या मागणीला सीएएसने फेटाळून लावत, अंतिम सामना थांबवू शकत नसल्याचं सांगितलं . यानंतर विनेशने याचिकेत दुरुस्ती करून संयुक्तपणे रौप्यपदक देण्याची मागणी केली.

याबाबत विनेशने याचिकेत असा युक्तीवाद केलाय की, तिचे वजन फक्त फायनलच्या दिवशी जास्त होते पण पहिल्या दिवशी तिने तीनही सामने निर्धारित वजन मर्यादेत खेळले. दरम्यान CAS ने ९ ऑगस्ट रोजी विनेशची बाजू ऐकून घेतली. यात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन देखील एक पक्ष बनले, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि UWW ने देखील त्यांचे विचार मांडले. याबाबतचा निर्णय १० ऑगस्टला होणार होता मात्र तो १३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT