Vinesh Phogat IANS
क्रीडा

Vinesh Phogat : रात्रभर व्यायाम, चक्कर येऊन पडली, विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Paris Olympic 2024 : पॅरिसमध्ये असलेल्या विनेश फोगाटची (Vinesh Phogat) प्रकृती बिघडली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Namdeo Kumbhar

Vinesh Phogat disqualified from Paris Olympic 2024 : विनेश फोगाटचं १०० गॅम वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे भारताची पहिल्या सुवर्णपदकाची संधी हुकली. आज विनेश फोगाटचा आज गोल्डसाठी सामना होता, पण त्याआधीच तिला (Vinesh Phogat) अपात्र ठरवण्यात आले. विनेश पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर अनेक भारतीयांच्या पदरी निराशा आली आहे. ५० किलो वजन गटात पात्र ठरण्यासाठी विनेशनं (Vinesh Phogat) रात्रभर प्रयत्न केले. मिडिया रिपोर्ट्सनुसार, तिने आपली नखे कापली, केसं कमी केली, रक्तही दिल्याचं समोर आले. त्याशिवाय विनेश फोगाट हिनं रात्रभर व्यायाम केला होता. पण तरिही ५० किलोपर्यंत वजन कमी करण्यात तिला अपयश आल्याचं समोर आले आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, विनेश फोगाटती (Vinesh Phogat Health) प्रकृती बिघडली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे विनेश फोगाटची प्रकृती बिघडली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विनेश फोगाटला आयव्ही फ्लूइड देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

विरोधकांनी विनेश फोगाटच्या वजनाबबात संशय व्यक्त केला होता. त्यानंतर ऑलिम्पिक कमिटीने वजन केलं. तेव्हा विनेशचं वजन मर्यादेपेक्षा फक्त १०० किलो जास्त असल्याचं निर्दशनास आले. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. ऑलिम्पिकच्या नियमांनुसार, मर्यादेपेक्षा थोडेही वजन जास्त असेल, तर कोणत्याही क्षणी खेळाडूला अपात्र ठरवण्यात येते.

विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर अनेक भारतीयांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर तिच्याबाबत ट्वीट करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनीही ट्वीट करत विनेश फोगाटचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय. तर संजय सिंह यांनी विनेश फोगाटला स्पर्धेबाहेर काढण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय.

विनेश फोगाटनं मंगळवारी महापराक्रम करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. पहिल्या सामन्यात विनेश फोगाटने अव्वल क्रमांकाच्या जपानच्या कुस्तीपटूला पराभवाचा धक्का दिला होता. जपानची सुवर्णकन्या असलेल्या युई सुसाकी हिला पराभूत करत विनेशने पदकाच्या दिशेने वाटचाल केली. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यातही विनेशने एकतर्फी विजय मिळवलत देदीप्यमान कामगिरी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT