Uttar Pradesh wicketkeeper-batter Dhruv Jurel celebrates his maiden List A century in the Vijay Hazare Trophy. saam tv
Sports

Dhruv Jurel: ब्लॉकबस्टर ८ षटकार अन् १५ चौकार! ध्रुव जुरेलचं शानदार शतक; विजय हजारे ट्रॉफीत चौकार-षटकारांचा पाऊस

Dhruv Jurel Century Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीमध्ये ध्रुव जुरेलने तुफान फटकेबाजी करत शानदार शतक केलंय. ध्रुव जुरेलनं बडोद्याविरुद्ध १५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १६० धावा केल्या.

Bharat Jadhav

  • ध्रुव जुरेलचे लिस्ट ए करिअरमधील पहिले शतक

  • बडोद्याविरुद्ध नाबाद १६० धावांची तुफान खेळी

  • १५ चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने आपल्या लिस्ट ए करिअरमधील पहिलं शतक झळकावलंय. सोमवारी राजकोट येथे झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याविरुद्ध खेळताना ध्रुव जुरेलने उत्तर प्रदेशकडून फलंदाजी करताना अवघ्या ७८ चेंडूत शतक झळकावले. तिसऱ्या क्रमांकवर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या उत्तर प्रदेशच्या ध्रुव जुरेलनं बडोदा संघाच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली.

त्याने १०१ चेंडूमध्ये नाबाद राहत १६० धावांची जबरदस्त खेळी केली. ध्रुव जुरेलच्या या खेळीमुळे उत्तर प्रदेशच्या संघाची धावसंख्या ३६९ वर पोहचली. ध्रुव जुरेलने त्याच्या खेळीत १५ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. या तुफान फटकेबाजीत त्याने वेगवान गोलंदाज रसिक सलामच्या षटकात ५५ धावा ठोकून काढल्या.

ध्रुव जुरेलची कामगिरी

पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध ८०(६१)

दुसऱ्या सामन्यात चंदीगड विरुद्ध ६७(५७)

तिसऱ्या सामन्यात बडोदा विरुद्ध १६०*(१०१)

ध्रुव जुरेल संघात परतण्यास उत्सुक

ध्रुव जुरेलने विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या मोहिमेची सुरुवात चांगली केली. त्याने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये हैदराबाद आणि चंदीगडविरुद्ध अर्धशतके झळकावली. आता तिसऱ्या सामन्यात त्याने १६० धावांची शानदार खेळी केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी जुरेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला कोणत्याही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

रिंकू सिंहने ६७ चेंडूत काढल्या ६३ धावा

तिसऱ्या क्रमांकावर ध्रुव जुरेलच्या नाबाद १६० धावांव्यतिरिक्त रिंकू सिंहने कर्णधाराप्रमाणे शानदार खेळी केली. डावखुरा फलंदाज रिंकूनं ६७ चेंडूत ६३ धावा केल्या. तर आयपीएलच्या मिनी-लिलावात १२.२ दशलक्ष रुपयांना विकल्या गेलेल्या प्रशांत वीरने २३ चेंडूत ३५ धावा केल्या. रसिख सलाम बडोद्यासाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत १०.२ च्या इकॉनॉमी रेटने १०२ धावा दिल्या. राज लिंबानीनेही ७४ धावा दिल्या पण चार विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फूट

Solapur News: दत्तात्रय भरणे मामा तुमची गेम करायला बसलेत! हत्येचा कट रचला जातोय, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Muncipal Election : कोल्हापुरात झाली महायुती, कोणता पक्ष किती जागा लढणार? सांगलीत मात्र एका कारणानं फिस्कटलं!

ऐन निवडणुकीत अजित पवार 'नॉट रिचेबल'? राजकारणात खळबळ

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे हाती घेतलेले लाखमोलाचे काम पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT