मराठमोळ्या खेळाडूकडे भारताचं नेतृत्व; U-19 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा, कोणाला मिळाली संधी अन् कोणाला डच्चू?

India U19 team : मराठमोळ्या खेळाडूकडे भारताचं नेतृत्व असणार आहे. U-19 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.
BCCI U19 squad
India U19 team Saam tv
Published On
Summary

U-19 वर्ल्डकप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशी कर्णधारपद देण्यात आलंय

U-19 वर्ल्डकपमध्ये आयुष म्हात्रे संघाचं नेतृत्व करणार आहे

अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ साठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळण्यात येणाऱ्या मालिकेसाठी अंडर-१९ टीमची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी कर्णधारपद वैभव सूर्यवंशीकडे देण्यात आला आहे.  U-19 वर्ल्डकपसाठी संघाचं नेतृत्व आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आला आहे. परंतु आयुष दुखापग्रस्त असल्याने मालिकेसाठी खेळताना दिसणार आहे.

ज्युनियर क्रिकेट सिलेक्शन कमिटीने आयसीसी मेन्स अंडर -१९ क्रिकेट वर्ल्डकप २०२६ आणि दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात ३ सामन्यांची वनडे सीरीजसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. झिम्बाब्वे आणि नामीबियामध्ये १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विश्वचषकाची स्पर्धा होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात टीम इंडिया तीन सामने होणार आहेत. ३,५ आणि ७ जानेवारी रोजी सामने होणार आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी U-19 भारताचा संघ:

वैभव सूर्यवंशी (कर्णधार), एरॉन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकिपर), हरवंश सिंग (विकेटकिपर), , खिलन ए. पटेल, मोहम्मद एनान, आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन, युवराज गोहिल आणि राहुल कुमार

BCCI U19 squad
विहिरीतून मोटार काढताना विपरीत घडलं; शॉक लागून बाप लेकासह चौघांचा मृत्यू, धाराशिवात हळहळ

बीसीसीआयच्या माहितीनुसार, आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्राच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे दोघे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार नाहीत. मात्र, दोघे आयसीसी मेन्स अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत सहभाग होतील.

BCCI U19 squad
Sunday Horoscope : लाईफ पार्टनरशी वाद-विवाद होण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

ICC मेन्स U19 वर्ल्ड कपसाठी U-19 भारताचा संघ:

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकिपर ), हरवंश सिंग (विकेटकिपर), आर. एस. अंबरीश,मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल आणि उद्धव मोहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com