hardik pandya with rahul dravid saam tv
क्रीडा

Venkatesh Prasad Statement: 'मुर्खासारखे विधाने करणं बंद करा अन्..', राहुल द्रविड अन् कॅप्टन पंड्यावर माजी क्रिकेटपटू जोरदार भडकले

Team India News: भारतीय संघाच्या सुमार कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 5th T20I Venkatesh Prasad Statement:

फ्लोरिडाच्या मैदानावर भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यातील ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या पराभवासह भारतीय संघाने टी -२० मालिका २-३ ने गमावली आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघावर आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद देखील भारतीय संघाच्या कामगिरीवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका केली आहे.

भारतीय संघाचे माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. खेळाडूंनी चांगली वाईट कामगिरी केल्यास ते सोशल मीडियावर ट्विट करून आपली प्रतिक्रिया देत असतात.

वेस्टइंडीज विरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर वेंकटेश प्रसाद मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर भडकले आहेत. त्यांनी ट्विट करत लिहिले की, ' भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये साधारण कामगिरी केली आहे. हा संघ त्या संघाकडून पराभूत झाला आहे जो संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. आपण बांगलादेश संघाविरुध्दची वनडे मालिका गमावली आहे. मी आशा करतो की, मुर्खासारखे विधाने करण्याऐवजी ते आत्मपरीक्षण करतील.' (Latest sports updates)

तसेच ते पुढे म्हणाले की, ' केवळ वनडे नव्हे तर काही वर्षांपूर्वी हा संघ टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी देखील पात्र ठरू शकला नव्हता. हे पाहून खूप वाईट वाटतंय की, भारतीय संघ निराशाजनक कामगिरी करतोय आणि हे सर्व प्रक्रिया सुरू आहे असं सांगून दाबलं जातंय. ती भूक, ती आग दिसतच नाही. भारतीय संघाच्या पराभवासाठी ते (राहुल द्रविड, हार्दिक पंड्या) कारणीभूत आहेत. त्यांनी उत्तर द्यायलाच हवं.'

' प्रकिया आणि असा शब्दांचा आता दुरुपयोग केला जातोय. संघ निवडण्यात आता कुठलीच स्थिरता दिसून येत नाही. नको त्या गोष्टी जास्त सुरू आहेत. भारतीय संघाला आपल्या कौशल्यात सुधार करण्याची गरज आहे.' असं वेंकटेश प्रसाद म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT