Vaibhav Suryavanshi Still Waits for His Opportunity saam tv
Sports

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

Vaibhav Suryavanshi Debut : वैभव सूर्यवंशीला पदार्पण करताना पाहण्याची आशा बाळगणाऱ्या चाहत्यांची पुन्हा निराशा झाली. दुसऱ्या टी-२० सामन्यातही सूर्यवंशीला संधी मिळाली नाहीये.

Bharat Jadhav

  • वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही पदार्पणाची संधी

  • भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले.

  • सूर्यांश शेडगे आणि प्रिन्स यादव यांनी टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही डेब्यू करण्याची संधी मिळाली नाहीये. पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यातही वैभव सूर्यवंशीचं डेब्यू न झाल्यानं चाहत्यांची निराशा झाली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्याच्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये भारतीय संघाने केवळ दोन बदल केले, परंतु त्यात वैभवचा समावेश नव्हता.

या सामन्यात टीम इंडियाने दोन नवीन खेळाडूंना संधी दिली, परंतु त्यात वैभवचा समावेश नव्हता. या निर्णयामुळे बेलफास्टमध्ये जमलेल्या भारतीय आणि स्थानिक चाहत्यांची निराशा झाली. वैभवला संधी मिळाली नसली तरी अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगे आणि वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव यांनी टीम इंडियात पदार्पण केलंय.

वैभवला आणखी किती काळ वाट पाहावी लागेल?

रविवार २८ जून रोजी बेलफास्ट येथे होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी पहिल्या सामन्यात फलंदाजांच्या अपयशानंतर वैभवला संधी मिळेल का, याबद्दल उत्सुकता होती. नाणेफेकीपूर्वी 'टीम इंडिया'त दोन नवीन खेळाडूंना त्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) कॅप्स देण्यात आल्या. मात्र वैभव सूर्यवंशीला पु्न्हा एकदा बाकावर बसून सामना पाहावा लागला. यामुळे आता वैभव सूर्यवंशीचा डेब्यू हा इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात होण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंडविरुद्ध टी२०मालिका १ जुलैपासून सुरू होणार आहे.

कोण आहे सूर्यांश आणि प्रिन्स?

डावखुरा मीडियम पेसर अष्टपैलू सू्र्यांश शेडगे आणि डावखुरा गोलंदाज प्रिन्स यादव यांना टी२० अंतराराष्ट्रीय करिअर सुरू करण्याची संधी मिळाली. त्यांना वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या जागी संघात घेण्यात आले. प्रिन्सने या महिन्यात झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडेत डेब्यू केलं होतं. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात प्रिन्सनं दमदार कामगिरी केली होती.

तर आयपीएल २०२६ मध्ये सूर्यांशने पंजाब किंग्स आणि प्रिन्स यादवनं लखनौ सुपर जायंट्सकडून शानदार खेळ खेळला होता. सूर्यांशने ७ डावांमध्ये १७५ च्या स्ट्राइक रेटनं १५८ धावा केल्या होत्या. तो देशार्गंत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात त्याने २०२४ मध्ये ही सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये छान कामगिरी केली आहे. प्रिन्स यादवन आयपीएल २०२६मध्ये १६ विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT