आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सुर्यवंशी वयाच्या मुद्द्यावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.... गुजरात टायटन्सविरोधात खेळताना युवा खेळाडू वैभव सुर्यवंशीने अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकलंय.. मात्र त्याचं वय 14 नसून 16 असल्याचा दावा करण्यात आलाय...तर त्यासाठी वैभव सुर्यवंशीच्या जुन्या व्हिडीओची क्लीप व्हायरल कऱण्यात आलीय...
वैभव सुर्यवंशीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ 2 वर्षांपुर्वीचा असल्याचं म्हटलं जातंय... ज्यात स्वतः वैभव सुर्यवंशीनेच वयाची कबुली दिलीय... त्यामुळे हा वाद आणखीच पेटलाय. वैभव सुर्यवंशी खरंच 14 वर्षाचा की 16 वर्षाचा? यावरुन सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ सुरु आहे... मात्र वैभव सुर्यवंशीच्या कागदपत्रांतून नेमकी काय माहिती समोर आलीय? पाहूयात...
वैभव सुर्यवंशीचा जन्म- 27 मार्च 2011
वैभव सध्या 14 वर्ष 32 दिवसांचा
आयपीएलच्या करारामध्येही वैभवचं वय 14 वर्षेच
वैभवच्या वयाची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरही हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही... त्यामुळे अखेर या प्रकरणात वैभव सुर्यवंशीच्या कोचने एण्ट्री केलीय...
खरंतर अत्यंत कमी वयात वैभव सुर्यवंशीने शतक ठोकलंय.. त्यामुळे तो उगवता तारा असल्याचं म्हटलं जातंय.. मात्र उमेदीच्या काळातच वैभव सुर्यवंशीच्या वयाचा वाद पुढे आल्याने पहिल्या घासालाच मीठाचा खडा लागलाय.. आता वैभव सुर्यवंशी वयाचा मुद्दा बाजूला सारत टीकाकारांना खेळातून उत्तर देणार का? याकडे लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.