Vaibhav Suryavanshi celebrates after a big shot as Iceland Cricket’s viral post takes over social media. saam tv
Sports

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मैदानात काय घडलं?

Arrest Vaibhav Suryavanshi Iceland Cricket Post: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक फलंदाजीवर आइसलँड क्रिकेटने एक पोस्ट केलीय. यात त्यांनी वैभवच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

Bharat Jadhav

  • वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीने इंग्लंडचे गोलंदाज हैराण

  • आइसलँड क्रिकेटची मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

  • “अटक करा” या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं

भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने क्रिकेटच्या मैदानावर भीम पराक्रम केलाय. झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी पुरुष १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात वैभवने इंग्लंडविरुद्ध अवघ्या ८० चेंडूत १७५ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याची खेळीनं अनेकांना थक्क केलं. मात्र त्याचवेळी वैभव सूर्यवंशीच्या अटकेची मागणी केली जातेय. काय आहे कारण जाणून घेऊ.

आइसलँड क्रिकेट बोर्डाची पोस्ट व्हायरल

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा मजबूत समाचार घेतला, त्याची फटकेबाजी पाहून सोशल मीडियावरही त्याच्या नावाची चर्चा होतेय. यात नेहमीच आपल्या मिश्किल पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या 'आइसलँड क्रिकेट' च्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. वैभवच्या फटकेबाजीवर कमेंट करताना त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमवर एक पोस्ट करत लिहिलंय की, "वैभव सूर्यवंशीला आत्ताच्या आत्ता अटक करा... इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध मैदानावर सुरू असलेला हा हिंसाचार 'X-rated' आहे. आइसलँड क्रिकेटची ही मजेशीर पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देऊ लागलेत.

वैभवची ही खेळी कोणत्याही आयसीसी (ICC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील (पुरुष, महिला आणि सर्व वयोगटातील) आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरलीय. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडच्या नावावर होता. हेडने २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम सामन्यात १६३ चेंडूत १७४ धावा केल्या होत्या. वैभवने केवळ १४ वर्षांचा असताना हा ऐतिहासिक टप्पा ओलांडून क्रिकेट विश्वाला थक्क केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला मतदान करणं भोवलं; MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी, आता पदही जाणार

ठाकरे बंधूंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप-शिंदेसेना महायुतीसोबत

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावातील विहिरीत दोन बिबटे पडले

एकनाथ शिंदेंच्या फोटोवर काळी जादू? घराबाहेर घडला प्रकार, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय?

अजितदादांच्या विमानात बॉम्ब? खासदारालाच शंका, देशाच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT