आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ मध्ये जाणारे ८ संघ ठरले आहेत. ज्यात भारत, अमेरिका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज आणि इंग्लंड या संघांनी प्रवेश केला आहे. सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेचा संघ बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.
अमेरिकेचा संघ पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. या स्पर्धेत अमेरिकेने शानदार खेळ करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. पहिल्याच सामन्यात कॅनडा आणि त्यानंतर अमेरिकेला पराभूत करत अमेरिकेने सुपर ८ फेरीचं तिकीट मिळवलं आहे. अमेरिकेकडून जोन्सने तुफान फटकेबाजी केली. तर जहांगीरला अजूनही हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तर सौरभ नेत्रावलकरच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असणार आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते अमेरिकेची प्लेइंग ११
स्टीवन टेलर, शायन जहांगीर, अँड्रीस गोस (यष्टीरक्षक), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली वॅन शल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवलकर आणि अली खान.
तर दक्षिण आफ्रिकेचा संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. एडेन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे नक्कीच संघाचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. संपूर्ण संघ जोरदार कामगिरी करत असला तरीदेखील संघाचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक संघाला हवी तशी सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११
क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सेन, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, ओटनील बार्टमन आणि तबरेज शम्सी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.