United States vs Ireland Saam Tv
Sports

USA ने इतिहास रचला, पहिल्यांदाच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

United States vs Ireland, T20 World Cup 2024: अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आहे. यासह पाकिस्तानचा संघ आता सुपर-८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

टी-२० विश्वचषकात अमेरिकेची आतापर्यंतची कामगिरी सर्वांनाच चकित करणार ठरली आहे. पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाचा भाग असलेल्या यूएसए संघाने सुपर ८ मध्ये स्थान मिळवलं आहे. हा पराक्रम करत अमेरिकेने इतिहास रचला आहे.

आज फ्लोरिडा येथे अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. पावसामुळे सामना सुरू होण्यासाठी सुमारे साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. मात्र खराब वातावरणामुळे नाणेफेक न होता सामना रद्द करण्यात आला.

अशातच दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आणि यूएसएने पाच गुणांसह सुपर-8 मध्ये प्रवेश केला. तर पाकिस्तानचा संघ सुपर-८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

दरम्यान, टी-२० विश्वचषकात अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. याआधी यूएसए संघाने कॅनडाविरुद्धही विजय मिळवला होता.

यूएसए संघासाठी आतापर्यंत आरोन जोन्स, सौरभ नेत्रावळकर, अली खान आणि नितीश कुमार यांनी चमकदार कामगिरी केली आहे. आरोन जोन्सने कॅनडाविरुद्ध जबरदस्त खेळी केली होती. या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा आरोन जोन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन सामन्यांत 141 धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Fort Making : दिवाळीत बच्चे कंपनीसोबत बनवा भव्य किल्ला, 'अशी' करा सजावट

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

Diwali Car Offers: दिवाळी धमाका! मारुती कंपनीच्या 'या' कारवर तब्बल 2 लाखांपर्यंतची सूट

'बदला घेतल्याशिवाय राहणार नाही'; रिलस्टार भैय्या गायकवाडचा VIDEO व्हायरल, मारहाण करणाऱ्यांना थेट धमकी

SCROLL FOR NEXT