umpire yandex
Sports

Cricket Records: ना Wide, ना No; तरीही या भारतीय फलंदाजाने ३ चेंडूत चोपल्या २४ धावा

Unique Cricket Records: एकही नो, एकही वाईड चेंडू नसताना भारतीय फलंदाजाने ३ चेंडूत २४ धावा काढल्या होत्या.

Ankush Dhavre

क्रिकेटमध्ये असे असंख्य रेकॉर्ड आहेत, जे मोडून काढणं खूप कठीण आहे. भारताचा मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे एकापेक्षा एक मोठ्या एक रेकॉर्डची नोंद आहे, जे मोडून काढणं तर दूर, त्याच्या जवळ पोहोचणंही कठीण आहे.

सचिनच्या नावे एका आगळ्या वेगळ्या रेकॉर्डची नोंद आहे, जो मोडून काढणं कठीण नव्हे तर अशक्य आहे. सचिनने ३ चेंडूत २४ धावा करण्याच्या कारनामा केला आहे. एका फलंदाजाने सलग ३ चौकार मारले तर तो १२ धावा करू शकतो. सलग ३ षटकार मारून १८ धावा करू शकतो. मात्र २४ धावा कशा? जाणून घ्या.

सचिन तेंडुलकरने २००२ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर असताना हा कारनामा केला होता. या दौऱ्यावर फलंदाजी करताना त्याने शानदार खेळी केली होती. ४ डिसेंबर २००२ ला क्राइस्टचर्चच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात सचिनने २७ चेंडूत ७२ धावांची वादळी खेळी केली. या खेळी दरम्यानच त्याने ३ चेंडूत २४ धावा केल्या होत्या.

आयसीसीमुळे झालं शक्य

हा सामना नॉर्मल सामना नव्हता, तर स्पेशल सामना होता. कारण या सामन्याला १०-१० षटकांच्या ४ डावात विभागलं गेलं होतं. यासह ११ ऐवजी १२ खेळाडू खेळत होते. मुख्य बाब म्हणजे साईट स्क्रीनच्या मागचा भाग हा मॅक्स झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. याचा अर्थ असा की, कुठल्याही फलंदाजाने चौकार मारला, तर त्याचे डबल म्हणजे ८ धावा मिळायच्या आणि षटकार मारला तर १२.

सामन्यात नेमकं काय घडलं?

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ५ गडी बाद १२३ धावा ठोकल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून सचिन तेंडुलकरने २७ चेंडूत ७२ धावांची खेळी केली.

या दरम्यान त्याने एक चौकार, एक षटकार आणि २ धावा मारल्या. त्यामुळे त्याला ८,१२ आणि ४ धावा मिळाल्या. अशाप्रकारे त्याने एकही वाईड, नो चेंडू नसताना ३ चेंडूत २४ धावा चोपल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT