uganda cricket team twitter
Sports

PNG vs Uganda: जल्लोष तर होणारच! ऐतिहासिक विजयानंतर युगांडाच्या खेळाडूंचा Victory डान्स - Video

Uganda Players Victory Dance: पापुआ न्यू गिनीवर मिळवलेल्या विजयानंतर युगांडा संघातील खेळाडूंनी भन्नाट डान्स केला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ९ व्या सामन्यात पापुआ न्यू गिनी आणि युगांडा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात युगांडाने शानदार कामगिरी करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. हा सामना युगांडाने ३ गडी राखून जिंकला आहे. यासह हा युगांडाचा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच विजय ठरला आहे.

या सामन्यात युगांडाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत युगांडा संघातील गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि पापुआ न्यू गिनी संघाचा डाव अवघ्या ७७ धावांवर आटोपला. पापुआ न्यू गिनी संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या संघाकडून फलंदाजी करताना हिरी हिरीने सर्वाधिक १५ धावांची खेळी केली. तर युगांडाकडून ४ गोलंदाजांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

युगांडाला हा सामना जिंकण्यासाठी ७८ धावांची गरज होती. हे आव्हान तसं मोठं नव्हतं. मात्र धावांचा बचाव करताना पापुआ न्यू गिनीच्या गोलंदाजांनी चांगलाच जोर लावला. हा सामना १९ व्या षटकापर्यंत गेला. अखेर युगांडाने हा सामना ३ गडी राखून जिंकला. दरम्यान या विजयानंतर युगांडा संघातील खेळाडूंनी विजयाचा जोरदार जल्लोष केला.

दरम्यान हे खेळाडू डान्स करताना दिसून आले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा विजय युगांडासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण यापूर्वी या संघाने टी-२० वर्ल्डकपमध्ये एकही सामना जिंकलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

SCROLL FOR NEXT