Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला पार्लमध्ये जाऊन पैसे वाया घालवायचे नसतील आणि घरच्या साहित्याने सुंदर नैसर्गिक चेहऱ्यावर तेज आणायचे असेल तर तुम्ही पुढील टिप्स नक्की फॉलो करा.
रोज रात्री झोपण्यापूर्वी कापसाने चेहऱ्यावर कच्चं दूध लावा. यामुळे त्वचेवरची धूळ-माती निघून स्किन सॉफ्ट आणि क्लीन होते.
आठवड्यातून तीन वेळा बेसन, दही आणि चिमूटभर हळद मिसळून फेसपॅक लावा. हा पॅक डेड स्किन काढून त्वचेला नैसर्गिक चमक देतो.
चेहऱ्यावर डलनेस असल्यास पिकलेला पपई मॅश करून हलक्या हाताने मसाज करा. पपईतील एन्झाइम्स टॅनिंग कमी करतात.
सकाळी एलोवेरा जेलमध्ये थोडं मध मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि ग्लो वाढतो.
फक्त बाहेरचे उपचार पुरेसे नाहीत, त्वचेला आतूनही डिटॉक्स करणं गरजेचं आहे.
दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
दररोज किमान 7 तासांची झोप आवश्यक आहे. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात आणि चेहरा फ्रेश दिसतो.