Sakshi Sunil Jadhav
आजकाल अनेक महिला आणि तरुणी पातळ आणि न वाढणाऱ्या भुवयांमुळे वैतागल्यात. चुकीची जीवनशैली, वारंवार थ्रेडिंग, हार्मोनल बदल आणि पोषणाची कमतरता यामुळे आइब्रो कमकुवत होतात.
ऐरंडीचे तेल आइब्रो ग्रोथसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. रात्री झोपण्याआधी हलक्या हाताने मसाज केल्यास केसांची वाढ सुधारते.
या तेलांमधले पोषक घटक पोर्स अॅक्टीव्ह करतात आणि आइब्रो मजबूत बनवतात. रोज वापर केल्याने काही आठवड्यांतच याचा फरक जाणवतो.
तेलात 1-2 थेंब रोजमेरी किंवा टी ट्री ऑइल मिसळल्यास अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल फायदा मिळतो.
व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधले ऑइल त्वचेला पोषण देतं आणि भुवया तुटण्याच्या समस्या कमी होतात.
कांद्याच्या रसातले सल्फर हे हेअर फॉलिकल्स सक्रिय करतं. रस वापरल्यानंतर लिंबाच्या रसाने भुवया स्वच्छ करा.
दररोज 3–5 मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण वाढते आणि पोषक घटक केसांपर्यंत पोहोचतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.