स्पेनने युएफा युरो कपच्या (UEFA Euro 2024) फायनलमध्ये इंग्लंडला २-१ ने धूळ चारत चॅम्पियनशिपवर नाव कोरलं आहे. रविवारी जर्मनीतील बर्लिनमध्ये पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर एकही सामना न गमावणाऱ्या स्पेनने बाजी मारली. स्पेनकडून मिकेल ओयारजाबलने ८७ व्या मिनिटाला गोल केला आणि स्पेनला सामन्यात चॅम्पियनशिप जिंकून दिली. यासह स्पेनचा संघ चौथ्यांदा विजयाचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये या संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. (Spain vs Englaand)
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत १-१ च्या बरोबरीत सुरू होता. सामना एक्स्ट्रा टाईममध्ये जाणार असं वाटू लागलं होतं. मात्र संघाला गरज असताना ओयारजाबलने मोक्याच्या क्षणी गोल केला आणि संघाला विजय मिळवून दिला. यासह संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या इंग्लंडला पराभवाची चव चाखावी लागली आहे. (Football News Marathi)
या सामन्यात सुरुवातीपासूनच स्पेनचा दबदबा पाहायला मिळाला. त्यावेळी इंग्लंडच्या कोल पामरने ७३ व्या मिनिटाला गोल करून देत इंग्लंडला १-१ च्या बरोबरीत आणलं. यापूर्वी सामन्यातील ४७ व्या मिनिटाला स्पेनच्या १७ वर्षीय लेमिन यामलने दिलेल्या पासचं निको विलियम्सने गोलमध्ये रुपांतर केलं.
चौथ्यांदा विजय मिळवल्यानंतर स्पेनच्या खेळाडूंमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. या विजयानंतर यामल, मार्क कुकुरेला आणि दानी ओल्मो यांनी प्रेक्षकांमध्ये जाऊन जल्लोष केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.