virat kohli, rohit sharma, ms dhoni
virat kohli, rohit sharma, ms dhoni  saam tv
क्रीडा | IPL

IPL 2023 : IPL सुरू असतानाच विराट, रोहित अन् धोनीला मोठा धक्का, असं घडलं तरी काय?

Ankush Dhavre

IPL 2023 Latest Updates: सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत एकूण २८ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरू असतानाच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या.

भारतीय क्रिकेटपटूंची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भारतीय क्रिकेटपटूंचा चाहतावर्ग हा जगभर पसरलेला आहे. त्यामुळे जगभरातील फॅन्स सोशल मीडीयावर आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला फॉलो करत असतात.

भारतीय क्रिकेटपटूंची फॉलोइंग ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र या क्रिकेटपटूंना माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने मोठा धक्का दिला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे ट्विटरवर २१.७ मिलियन, एमएस धोनीचे ८.५ आणि विराट कोहलीचे ५५.१ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. असे असून सुद्धा रात्रभरात रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूंची ब्लु टीक गायब झाली आहे. ट्विटरने हे पाऊल उचलातच नव्या चर्चेला उधाण आले आहे. (Latest sports updates)

या खेळाडूंचे देखील ब्लु टीक हटवण्यात आले..

या दिग्गज खेळाडूंसह ७.९ मिलीयन फॉलोवर्स असणारा लखनऊचा कर्णधार केएल राहुल, २.५ मिलियन फॉलोवर्स असणारा सूर्यकुमार यादव, ३.५ मिलियन फॉलोवर्स असणारा चहल, ३८.५ मिलियन फॉलोवर्स असणारा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, सनिया मिर्झा आणि सौरव गांगुली सारख्या दिग्गज खेळाडूंचे देखील ब्ल्यु टीक गायब झाले आहे. (Twitter Removed Blue Tick)

केवळ भारतीय नव्हे तर परदेशी खेळाडूंचे देखील ब्ल्यु टीक गायब..

ट्विटरने केवळ भारतीय खेळाडूंचे ब्ल्यु टीक काढले नसून याचा फटका परदेशी खेळाडूंना देखील बसला आहे. जगप्रसिद्ध फूटबॉलपटू रोनाल्डोची ब्ल्यु टीक देखील काढून घेण्यात आली आहे.

इतकेच नव्हे तर बाबर आझमची ब्ल्यु टीक देखील हटवण्यात आली आहे. एलोन मस्कने ट्विटरचा ताबा घेताच घोषणा केली होती की, २० एप्रिल पासून ट्विटरचं ब्ल्यु टीक हटवण्यात येणार आहे. आता ज्याला कोणाला ब्ल्यु टीक हवी असेल त्याला पैसे मोजावे लागणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: उमरगामध्ये मध्यरात्री २० ते २५ गाड्यांची तोडफोड

Shivali Parab : तुझे केस पाठीवरी मोकळे...

Shiv Sena UBT: खोटेपणा साप, बाळासाहेबांचा शाप..! Sanjay Raut नरेंद्र मोदींबाबत काय बोलून गेले?

Pandharpur Vitthal Rukmini Temple News: पांडुरंगाच्या भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी!

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींनीच केला खुलासा

SCROLL FOR NEXT